राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखी पदयात्रा सोमवारी चंद्रपूरात.
एस.के.24 तास
चंद्रपूर : ग्रामजयंती निमित्ताने अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गुरूकुंज आश्रम मोझरी वरून काढण्यात आलेली राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका पालखी रथयात्रा चंद्रपूरात येत्या सोमवारी दि.२४ एप्रिल रोजी सकाळी भिवापूर येथील हनुमान मंदिरात पोहोचत आहे. तर दुपारी ११.३० वाजता ही पालखी श्रीसंत गजानन महाराज मंदिर, वडगाव,चंद्रपूर येथे आगमन होत आहे.
येथे अर्ध्या तासाचा पालखीचा मुक्काम असल्याने भाविकांना प्रत्यक्ष माऊलींच्या चरण पादुकांचे दर्शन लाभ होईल. तसेच राष्ट्रसंत रचित भजनांचा स्वानंद भाविकांना अनुभवता येईल. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयंत मामीडवार यांच्या हस्ते आरती करण्यात येईल.
याप्रसंगी अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी चंद्रपूर शहरातील भाविकांनी या सुवर्ण योगाचा अवश्य लाभ घ्यावा,असे पालखी प्रमुख प्रा.चरडे यांनी कळविले .