विजयी झालेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सत्कार करण्यात आला.
एस.के.24 तास
राजूरा : कृषि उत्पन्न बाजार समितिच्या (जि. चंद्रपूर) संचालक पदाच्या निवडणुकीत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून विजयी झालेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार रविवार दि.30.04.2023 रोजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते नवनिर्वाचित संचालक सतीश कोमरवेल्लीवार,संजय पावडे,राकेश हिंगाने, नवनाथ पिंगे,सौ.विठाबाई झाडे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी आमदार संजय धोटे,भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, जिल्हा सचिव हरिदास झाडे,रूपेश कोमरवेलीवार सह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांच्या शेतमालाला व्यापाऱ्यांकडून रास्तभाव मिळवुन देण्या सोबतच बाजार समिती मध्ये शेतकर्यांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना व्यक्त केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.