लक्षावधी रुपये खर्च होऊनही गावकरी तहानलेलेच...!


लक्षावधी रुपये खर्च होऊनही गावकरी तहानलेलेच...!


★ भूवैज्ञानिकाने पुष्टी केलेले पाणी स्त्रोत कोरडेच.


★ व्यथा मचारणा येथील पाणी पुरवठा योजनेची.


एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) शासन जनकल्यानार्थं अनेक लोकोपयोगी योजनांची निर्मिती करून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नसल्यामुळे गावकऱ्यांना याचा काहीही उपयोग होत नसतो. याचा प्रत्यय मचारणा, तालुका लाखनी येथे आला. पाणी पुरवठा योजनेकरीता भूवैज्ञानिकाने निर्देशित केलेले जलस्त्रोत कोरडे निघाल्याने लक्षावधी रुपये खर्च करूनही ग्रामवासी तहानलेलेच आहेत. म्हणण्याची पाळी आली आहे. 

मचारणा,तालुका लाखनी येथील लोकसंख्या अंदाजे ११२५ असून सार्वजनिक विहिरी व हातपंपावरून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात असे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे. ग्रामीण परिसरातील जनतेला शुद्ध व स्वच्छ जल पुरवठा व्हावा. या करिता ग्रामपंचायतीचे मागणी वरून आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा कडून नवीन नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी प्रदान करण्यात आली. अंदाजपत्रकिय रक्कम ५० लक्ष ४९ हजार रुपये असली तरी ई-निविदा पद्धतीने कमी दरात देवरी, जिल्हा गोंदिया येथील उमा कन्स्ट्रक्शन ला नळ पाणी पुरवठा योजना बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. कार्यारंभ आदेश मार्च २०१९ मध्ये दिला गेला असला तरी कोविड-१९ मुळे या योजनेचे काम बंद होते. जिल्हा कोरोनामुक्त झाल्या नंतर कामास सुरुवात करण्यात आली. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम कनिष्ठ अभियंता श्रुती मेघे यांचेकडे होते. 


मार्च २०२२ मध्ये पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आल्यानंतर चाचणी(टेस्टिंग) चे वेळी जलस्त्रोतात नगण्य जलसाठा असल्यामुळे जलकुंभात पाणी पोहचले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जलकुंभाची क्षमता ५० लिटर असल्यामुळे दररोज ५० हजार लिटर पाणी जलस्त्रोतातून उपलब्ध होणे अशक्यप्राय बाब असल्याने पाणी पुरवठा विभागातील भूवैज्ञानिकाकडून भूगर्भातील जलसाठ्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी विंधनविहीर(बोअर) खोदकाम करण्यात आले. पण जलस्त्रोतात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे उन्हाळ्यातही ग्रामवासी तहानलेलेच राहणार असल्याचे दिसते. 


भूवैज्ञानिकाची संशयास्पद भूमिका

भूगर्भातील पाण्याची पातळी शोधून पाणी पुरवठा योजनेकरिता जलस्त्रोत निर्मितीचे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील भूवैज्ञानिकाचे आहे. पण भूवैज्ञानिकाने निश्चित केलेल्या ठिकाणी बोअर मारले असता कोरड्याच निघाल्याने भूवैज्ञानिकाची संशयास्पद भूमिका दिसून येते. 


दर्जाहीन बांधकामामुळे जलकुंभास गळती


मचारणा येथील पाणी पुरवठा जलकुंभाचे बांधकाम मार्च २०२२ ला पूर्ण करण्यात आले. पाईपलाईन लिकेजमुळे चाचणीचे वेळी जलकुंभात पाणी पोहचले नाही. थातूरमातूर दुरुस्ती नंतर जलकुंभात पाणी पोहचले. पण जलकुंभातून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्याने जलकुंभाचे निकृष्ट बांधकाम झाले आहे. 


पाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोतात पर्याप्त जलसाठा उपलब्ध नसल्यामुळे भूवैज्ञानिकांच्या निर्देशानुसार मार्च २०२३ अखेर ३ ठिकाणी बोअरवेल चे खोदकाम करण्यात आले.पण त्याही कोरड्याच निघाल्या. 

- जी.एम. बारस्कर,ग्रामसेवक मचारणा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !