तुमसर तालुक्यात सत्य शोधक विवाह नव दांपत्याचा क्रांतिकारी निर्णय.

तुमसर तालुक्यात सत्य शोधक विवाह नव दांपत्याचा क्रांतिकारी निर्णय.


एस.के.24 तास


गडचिरोली : डचिरोली जिल्हा माळी समाज सेवा संघाचे, सल्लागार भिमराज पात्रीकर सर यांचे मुलाचे विवाह दि.8/4/2023 रोजी मुलीचे घरी ,रा . पिंपरी चुनी  ता. तुमसर जि.भंडारा येथे सत्य शोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला. 



मुलगा राहूल सविता व भिमराज पात्रीकर   रा.ईंजेवारी ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली तर मुलगी भारती पार्वता व धनपाल राऊत यांनी समाजातील अंधश्रद्धा व  पारंपारिक पद्धतीला नाकारत तात्या साहेब महात्मा फुले व क्रांति ज्योती  सावित्रीआई फुले यांचे विचारांना स्विकारत आपला विवाह सत्य शोधक पद्धतीने पार पाडून घेतला ,समाजाला एक नवी दिशा  दिली   त्या मूळे भंडारा जिल्हयात सर्वत्र त्यांचे कौतुक केल्या जात आहे . मुलीचे वडील व्यवसायाने शेतकरी असून, आपल्या मुलीचे विवाह सत्य शोधक पद्धतीने लावले त्या बदल त्याचे सुदधा अभिनंदन करण्यात येत आहे.


भिमराज पात्रीकर सर हे व्यवसायाने शिक्षक असून त्यानी अनेक सामाजिक संघटनांशी जुळवून घेत, सामाजिक कार्यात सहभागी होत असतात, सामाजिक प्रबोधन ही करतात, त्यानी आपली  मोठी मुलगी शितल हीच सुदधा शेखर लांजेवार रा.मोठी दिघोरी जि.भंडारा यांचेशी  सत्य शोधक पद्धतीने विवाह लावले होते हे विशेष, .आपल्या मुला, मुलीचे सत्य शोधक पद्धतीने लावून समाजाला  नवी दिशा दिली. 


या सत्य शोधक विवाह प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व विवि कर्ते प्रदिप खोबरागडे,वैरागड यांनी केले तर सत्य शोधक विवाह मंगलाष्टके,रूचिक बारस्कर यांचे आॅडिओ क्लिप मधून घेतले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भूजंग पात्रीकर, नंदू बारस्कर शेखर लांजेवार ,पिंपरी चुनी येथील संरपंच, गावातील पदाधिकारी, दोन्ही कडील आप्त, मित्र परीवार बाहेर गावातील पाहूने,गावकरी मंडळी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !