ब्रह्मपुरी तालुक्यातून चित्रकला स्पर्धेत कु.आरती दशरथ दोनाडकर तालुक्यातून अव्वल.
प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे हस्ते विजेत्यांचा सत्कार.
एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : ( अमरदीप लोखंडे ) दिनांक,१०/०४/२३भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी च्या वतीने २४ जानेवारी २०२३ रोजी इयत्ता आठवी ते बारावीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेसाठी केलेल्या विधायक निर्णयाचे चित्र काढण्याची ही स्पर्धा होती. ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण १३ शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील ३९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दिनांक 9 एप्रिल रोजी सामाजिक न्याय सप्ताहाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक वाचनालय, ब्रम्हपुरी येथे ब्रम्हपुरी तालुका आणि शहर मधून विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातून कु.आरती दशरथ दोनाडकर, नितीन हायस्कूल अड्याळ,प्रथमकु. कशीश दिवाकर ठाकरे निरूपा विद्यालय रुई, द्वितीय तर विकी संतोष निकेसर ,तृतीय यांनी क्रमांक पटकावले.
प्रोत्साहन पर बक्षीस कु.काजल कौर अजित सिंग दुधानी, लोक विद्यालय गांगलवाडी,वनश्री अभय जांभुळे ज्ञानोपासक विद्यालय निलज,कुंदन मधुकर तलमले कृषक विद्यालय चौगान,सानिया देविदास राऊत ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा,प्रज्वल रवींद्र मुलकर ज्ञानगंगा विद्यालय हळदा, तनवी प्रभाकर गुरनुले महात्मा फुले विद्यालय मेंडकी, भूषण विजय मस्के मिलिंद विद्यालय भुज,सानिया हेमराज रामटेके छत्रपती शाहू महाराज विद्यालय ,वायगाव, अनामिका राजन शंभरकर महात्मा फुले विद्यालय किन्ही, महेश्वरी सुधीर करकाडे कर्मवीर विद्यालय मुडझा,कल्याणी अरुण किरसान अनुदानित आश्रम शाळा एकारा.यांना प्रा.अतुलभाऊं तथा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य, क्रिष्णा सहारे जिल्हा महामंत्री, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुणजी शेंडे, शहराध्यक्ष अरविंद नंदुरकर, डॉ.गोकुल बालपांडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, प्रा.जुमडे सर, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलाल महादेव दोनाडकर, मनोज भुपाल जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा,रश्मीताई पेशने भाजपा जिल्हा सचिव, प्रा,अशोक सालोटकर शहराध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा,प्रेमलाल धोटे तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, प्रा.संजय लांबे भाजपा कार्यालय मंत्री, वंदनाताई शेंडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, मनोज वठे महामंत्री तथा नगरसेवक ब्रह्मपुरी,मंजिरी राजनकर,हेमलता नंदुरकर,सुरेखा ताई बालपांडे, पुष्पाताई गराडे, साकेत भानारकर, नामदेव लांजेवार उपसरपंच अड्याळ, सदाशिव ठाकरे उपसरपंच रणमोचन,, लीलाराम राऊत,विक्रम कावळे,भागवत सर इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य सुयोग बाळबुध्दे शहराध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी,प्रास्ताविक इंजिनियर अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा ब्रम्हपूरी, आभार तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो यांनी मानलें.