मुल मध्ये काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीच्या विजयी रावत पॅनलचा दणदणीत विजय.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
मुल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला ही निवडणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली होती.
या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटातून राकेश रत्नावर घनश्याम येनुरकर राजेंद्र कन्नमवार अखिल गांगरेडीवार सुनील गुद्दनवार किशोर घडसे हसन वाढई विजय झाले सेवा सहकारी मतदारसंघ महिला राखीव गटातून चंदा विनोद कांबळी उषा योगेश शेरकी इतर मागासवर्गीय गटातून सुमित आरेकर संदीप कारमवार विजय झाले ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून राहुल मुरकुटे आणि लवकळसकर अनुसूचित जाती जमाती गटातून शालिक दहिवले आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातून जालिंदर बागळे विजय झाले तसेच अडते व्यापारी गटातून अमलबच्चीवर आणि तुकाराम घोगरे विजय झाले.
तसेच हमाली मापारी गटातून रमेश बर्डे हे याआधी बिनविरोध विजय झाले होते निकालानंतर तहसील कार्यालय परिसरात उमेदवारांची ल्यारी काढण्यात आली व जल्लोष करण्यात आला.