गोंदिया – बल्लारशा गाडी अडवली.

 


गोंदिया – बल्लारशा गाडी अडवली.



एस.के.24 तास


गोंदिया : गोंदिया-चांदाफोर्ट या रेल्वेमार्गावर गेल्या महिनाभरापासून समस्येत वाढ झाली आहे. या मार्गावरील पॅसेंजर गाडया दररोज दोन ते तीन तास उशिरा धावत आहेत. गुरुवारी सकाळीसुद्धा असाच प्रकार घडल्याने संतप्त प्रवाशांनी गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील नवेगावबांध रेल्वे स्थानकावर गोंदिया बल्लारशा पॅसेंजर गाडी अडवली.


गोंदियाहून सकाळी ७:३० वाजता बल्लारशाकडे जाणारी गोंदिया-बल्लारशा ही गाडी गुरुवारी सकाळी नियोजित वेळी ९:५० ला नवेगावबांध रेल्वे स्थानकावर पोहचली.मात्र या रेल्वे स्थानकावरून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना न होता याच ठिकाणी दीड तास थांबवून ठेवण्यात आली.


त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला.प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी रूळावर उतरून आपला संताप व्यक्त केला.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !