रोजगार हमीला आधारची साथ आधार कार्ड अपडेट असेल तरच होईल रोजगार हमीची मजूरी जमा. ★ नाहीतर करावे लागेल रोजगार हमीला बॉय-बॉय.?

रोजगार हमीला आधारची साथ आधार कार्ड अपडेट असेल तरच होईल रोजगार हमीची मजूरी जमा.


★ नाहीतर करावे लागेल रोजगार हमीला बॉय-बॉय.?

 

नरेंद्र मेश्राम


भंडारा  : केंद्र सरकारने महाराष्ट्राची रोजगार हमी योजनाचे सण २००५ ला कायद्यात रूपांतर करून सर्व देशभर ही महत्त्वकांशी योजना म्हणून राबविण्यात आली असलीतरी ह्या योजनेचे खरे स्वरूप निश्चितीकरिता प्रत्येक वर्षाला असलेल्या त्रुट्याची दुरुस्ती करून नवनवीन प्रकारचे बदल घडून आणले जाते  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मजुरांची डिजिटल हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.त्यानंतर मज़रांचे आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते मजुरी जमा करण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. 

 

मात्र,यासाठी मजुराचे आधारकार्ड अपडेट असणे आवश्यक आहे.अन्यथा बँक खात्यावर मजूुरीची रक्कम जमा होण्याची अडचण निर्माण होणार आहे. रोजगार हमी योजना कामाच्या हजेरी पत्रकावर बोगस मजुरांची नावे नोंदवून मज़ुरीची उचल केली जात होती.जिल्ह्यात असे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले होते. तर यासंदर्भातील तक्रारींमध्ये सुद्धा वाढ झाली होती.त्यामुळे केंद्र शासनाने या अनागोंदी कारभाराला कायमचा पायबंद लावण्यासाठी डिजिटल हजेरीचा निर्णय घेतला. या योजनेतर्गत काम करणाच्या कामाच्या कार्यस्थळावर नॅशनल मोबाइल मानिटरिंग सिस्टम(NMMS) या मोबाइल अँपवर मज़ुरांची दैनंदिन हजेरी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. 


सार्वजनिक कामासाठी हा निर्णय आता बंधनकारक करण्यात आला असल्याने आता रोजगार हमीच्या कामावरील मजुरांचे पैसे थेट मजुरांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.मात्र यासाठी मजुराचे बँक खाते आधारकार्डसह लिंक असणे अनिवार्य आहे असलेतरी रोजगार हमीची मजुरी जमा करण्याकरिता आधारकार्ड अपडेट करून आधारकार्ड क्रमांक व नावासहीत सिडिंग करणे आवश्यक आहे.


 अन्यथा मजूरी जमा होणार नाही हे खरे असलेतरी आधार अपडेटिंगची समस्या वारंवार भेडसावत असणारी असून मजुरी जमा व्हायला चाळणीत पाणी आणण्यासारखे कसरत करावी लागेल ज्या मजुरांचा आधार अपडेट असेल त्यांचाच हजेरीपत्रकावर नाव येणार असलेतरी प्रत्यक्ष सदर मस्टरची एका मजुरांची अपडेटिंग झाली नाहीतरी मस्टरवरील सर्व मजुरांना मिळणाऱ्या मजुरीपासून मुकावे लागणार की विलंब मजुरीची वाट पहावी लागेल ह्यात संशयास्पद वाटत असले तरी नियमित मजुरी मिळण्याकरिता आधार सिडिंग करावीच लागेल.?

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !