शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवा खासदार अशोक नेते या़ंचे अमिर्झा येथील शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन.
एस.के.24 तास
गडचिरोली : या कार्यक्रमाला विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करून या माध्यमातुन विविध योजनांचे स्टाल उपलब्ध केले होते.यानिमित्ताने जनतेपर्यंत विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा असे आव्हान खासदार अशोक नेते या कार्यक्रमाप्रसंगी केले.
खासदार अशोकजी नेते यांनी शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरकारी योजनेचा उद्देश म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने राबविल्या जाणारे योजना होय.त्यामुळे शासनाच्या विविध योजना जनसामान्यपर्यंत पोहचवून लाभ देण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.
कोणत्याही शासनाच्या या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना देण्यास किंवा योजनांची माहिती काही अधिकारी वर्ग सुद्धा हलगर्जीपणा करतात.त्यामुळे जनसामान्य लोकांपर्यंत योजनेचा लाभ भेटत नाही.शासनाचे विविध योजना विषयी व लाभार्थीचे विषयी अधिकारी वर्ग हलगर्जीपणा केल्यास त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.यावेळी केंद्रशासनाच्या विविध योजनाविषयी माहिती उपस्थितांना खासदार महोदयांनी देऊन शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार,डॉ.देवराव होळी,जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,तहसीलदार गणवीर साहेब,तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, योगेंद्रजी शेंडे साहेब,अर्चना नंदेश्वर सरपंच,आकाश निकोडे,सरिता टेंभुर्णे सरपंच, सोनाली नागापुरे, विज्ञान कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य कऱ्हाडे सर,प्रकल्प संचालक (आत्माचे) डाखोरे साहेब,मासतोडी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी मडावी साहेब,देविदास नागरे तसेच अनेक कार्यकर्ते व शिबिरांचा लाभ घेणारे अनेक मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.