हजारो नागरीकांचा मोर्चा धडकला तहसिल कार्यालयावर. ★ बुद्धिष्ट समाज संघर्ष समितीचे आयोजन.

हजारो नागरीकांचा मोर्चा धडकला तहसिल कार्यालयावर.


★ बुद्धिष्ट समाज संघर्ष समितीचे आयोजन.


नरेद्र मेश्राम !जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : संविधानाचे उल्लघन करणे बंद करा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सम्मानित करा यांसह अन्य मागण्यांना घेऊन तालुकाभर  संविधान जनजागृती रॅली काढून शेवटच्या दिवशी हजारो नागरीकांचा मोर्चा लाखांदूर तहसिल कार्यालयावर धडकला. लाखांदूर येथील बुद्धिष्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने १० एप्रिल रोजी महामोर्चाचे आयोजन केले होते. लाखांदूरचे तहसिलदार वैभव पवार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.



सविस्तर असे की,संविधानाचे उल्लंघन करणे बंद करा,महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, ओबिसींची जातीनिहाय जनगणना करा,ई व्ही एम द्वारे निवडणूक प्रक्रिया बंद करा,शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा करा,खाजगीकरणं बंद करा, अतिक्रमण धारकांना पट्टे द्या,घरकुल निधित ३ लाख रुपयांपर्यंत वाढ करा, शालेय अभ्यासक्रमातून भारतीय संविधान शिकवा यांसह अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी तालुका भर संविधान जनजागृती अभियान राबविला. 


लाखांदूर येथील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात ६ एप्रिल ते ९ एप्रिल २०२३ पर्यंत संपूर्ण लाखांदूर तालुक्यात संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता दिघोरी मोठी येथून या संविधान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली तालुक्यातील सर्वच गावांतुन काढण्यात आली. 


या रॅलीचे मुख्य संयोजक चंद्रशेखर टेंभुर्णे, संयोजक मनोज बंसोड, बुद्धिष्ट संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष मंगेश सुखदेवे, संदिप मोटघरे, प्रकाश बारसागडे, बबन गजभिये, अनिल कानेकर,प्रा उद्धव रंगारी, गोपाल मेंढे, जितु सुखदेवे, नगरसेनक गोलु सुखदेवे, निर्भय गायकवाड,जयंत झोडे,ताराचंद मातेरे,सुरेश लंजे, शंकर हुमणे,प्रयोजीत रंगारी, ज्योती रामटेके, सुवर्णा बोरकर,अर्पणा जांगळे,बिंदू रामटेके, वनिता गायकवाड,अरविंद रामटेके, रामदास बडोले,प्रकाश रंगारी, दिलीप रामटेके,संदिप खोब्रागडे, दिक्षा बोदेले,वामन कांबळे,रोशन नंदेश्वर,प्रेमानंद गोस्वामी,अमोल हरणे,अमृत मदनकर यासह बहुसंख्य भारतीय संविधानाचे अभ्यासक,त्यास मानणारा वर्ग व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.


लाखांदूरचे तहसिलदार वैभव पवार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.


तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने थंड पाणी व चहाची व्यवस्था लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात स्थानिक लाखांदूर येथील त्रिरत्न बौद्ध विहारा पासून करण्यात आली. त्रिरत्न बौद्ध विहारापासून लाखांदूर जवळपास ३ किमी अंतरावर असलेल्या तहसील कार्यालयापर्यंत पायी जात असलेल्या महामोर्चातील सहभागी बांधवांना लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पिण्याच्या थंड पाण्याची व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीसांचा चोख बंदोबस्त : -

मागील ६ एप्रिल पासुन तालुकाभर संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली तर शेवटच्या दिवशी तहसिल कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. तब्बल ४ दिवसापासुन सुरु असलेल्या या रॅलीत कुठलीही अनुचित घटना घडु नये म्हणुन लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे व दिघोरी मोठीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !