महापुरुषांच्या विचारांचा वारसा जोपासने काळाची गरज. - भोजराज गभणे
चिखली येथे थोर महापुरुष जयंती व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाला लाभलेले थोर महापुरुष असून त्यांच्या विचारांची प्रगल्भता फार विशाल आहे.त्यांचा विचारांचा वारसा जोपासने आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा भंडारा जिल्ह्याचे प्रचारक भोजराज गभणे यांमी केले.
ते पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील चिखली येथे एकता नेहरू युवा मंडळ केसलवाडा च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त सार्वजनिक जयंती समारोह आणि पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाजवळील पटांगणात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष विनोद शेंडे हे होते.मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा भंडारा जिल्ह्याचे प्रचारक भोजराज गभणे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच विशेष अतिथी म्हणून स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना चे जिल्हाध्यक्ष शेखर जीभकाटे, पवनी पंचायत समितीच्या सदस्या कल्याणी कुर्जेकर, चिखली ग्रामपंचायत च्या सरपंच महंता देशपांडे, पोलीस पाटील सुरेश काटेखाये,मुलचंद देशपांडे,रामू काटेखाये,माडगीचे क्षेत्र सहाय्यक श्री.रंगारी साहेब,पुरुषोत्तम बारसागडे,ग्राम पंचायत सदस्य संजय देशपांडे,जोतिष तिरपुडे,सदस्या भारती कुर्झेकर,नमिता बारसागडे,पत्रकार पंकज वानखेडे, माहिती अधिकार व पत्रकार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सत्कारमूर्ती घनश्याम ठोंबरे यांचा महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सेवा पुरस्कार,प्रदीप घाडगे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार, शितल वैरागडे यांचा धनंजयराव गाडगीळ सहकार रत्न पुरस्कार सन्मानचिन्ह व व गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक पत्रकार, जिल्हा युवा पुरस्कार पुरस्कृत जयेंद्र चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन जयंती आयोजन समारोह समितीचे उपाध्यक्ष प्रतीक रामटेके यांनी केले.तर सचिव संजय उके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजन समितीचे सदस्यगण नागोराव वाहाने, उमरीचे ग्रामपंचायत सदस्य शोभिवंत गेडेकर,राजेश ब.वाहाने,स्वप्नील चिचोलकर,लीलाधर चव्हाण,चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश देशपांडे,कैलास कुर्झेकर,स्वास्तिक धारगावे,माजी सरपंचा ज्योत्स्ना शेंडे,मेघा मेश्राम,अर्चना धारगावे, समीक्षा वाहाणे यांनी मोलाचे सहकार्य केले.