अहेर-नवरगाव येथे श्रीमद देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताह संपन्न.

अहेर-नवरगाव येथे श्रीमद देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताह संपन्न.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१०/०४/२३ तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथे हनुमान मंदीर देवस्थान येथे श्रीमद देवी भागवत रहस्य, ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य, हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या  कित्तेक वर्षांपासून हनुमान मंदिर कमिटी तर्फे येणाऱ्या पिढीला भक्तीची नाळ जुळून राहावी व त्यांच्या हातून सत्कर्म घडावे,खेळ्या- पाड्यात ग्रामगीतेचा प्रसार व प्रचार व्हावा या करिता श्रीमद् देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.


सात दिवस सुरू असलेल्या श्रीमद् देवी भागवत रहस्य, ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य, हरिनाम सप्ताहाची सांगता दि.०७ एप्रिल ला भक्तिमय वातावरणात हजारो भक्ती भाविकांच्या उपस्थितीत झाली.या प्रसंगी सु. श्री. साध्वी दिलाशा मेगशाम ठलाल  यांनी दि.०१ एप्रिल ते ०७ एप्रिल दरम्यान  आपल्या अमृत्यूल्य वाणीतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी गाडगेबाबा यांचे कृतिशील विचार आपल्या भागवत प्रवचनाच्या माध्यमातून उदाहरणांसह सांगितले तर दैनंदिन कार्यक्रमात हरिपाठ ,सामुदायिक प्रार्थना, भगवत गीता प्रवचन, व्यसनमुक्ती मार्गदर्शन व भजन कीर्तनाच्या गजरात रामधूम ,झाकी प्रदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला समारोपीय दिवशी गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हजारो नागरिकांनी रामारोपीय कार्यक्रम,गोपालकाला व महाप्रसादाचा आस्वाद घेतला.


सदर समारोपीय कार्यक्रमाला व गोपालकाल्याला अँड. आशिष गोंडाने,तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर,सरपंच सौ दामिनी चौधरी,ग्रा.पं.सदस्य श्रीकांत पिलारे,माजी पं.समिती उपसभापती विलास उरकुडे,नानाजी बगमारे,प्रा.मंगेश देवढगले,प्रा.प्रशांत राऊत व गावकरी मंडळी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !