भारतीय जनता पार्टी तालुका सिरोंचा बुथ सशक्तिकरण अभियान अंतर्गत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची संघटनात्मक बैठक.

भारतीय जनता पार्टी तालुका सिरोंचा बुथ सशक्तिकरण अभियान अंतर्गत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची संघटनात्मक  बैठक.


★ खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विस्तारक,शक्तीकेंद्र,बुथप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.


एस.के.24 तास


सिरोंचा : दिनांक,२५ एप्रिल २०२३ बूथ सशक्तिकरण अभियान आढाव्याच्या संदर्भात सिरोंचा तालुक्याची संगठनात्मक बैठक क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  विश्रामगृह येथे पार पडली.



जिल्हा संघटन महामंत्री रविंद्रजी ओल्लालवार यांनी उपस्थितांना बुथ सशक्तिकरण अभियानाच्या संदर्भात प्रस्तावनापर माहिती दिली. बुथ सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यकर्त्यानी संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भेदाभेद न करता एक मताने  चांगले भाजपाचे संघटन करावे.असे मार्गदर्शन भाजपाचे जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांनी केले.


त्यानंतर खासदार अशोकजी नेते यांनी बुथ सशक्तिकरण अभियान बैठकिचा  समारोप करतांना सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याचे विचार विनिमय व्यक्त करून झाल्यानंतर  तालुका पातळीवर सुरू असलेल्या बूथ रचनेचा आढावा घेत तालुक्याची उर्वरित बुथ रचना मजबूत करावी आपण जर बुथ जितो चुनाव जितो यानुसार जर काम केलो तर नक्की आपण यशस्वी होऊ. बुथ रचना झाली नसेल तर लवकरात लवकर पुर्ण करावी,अतीडोंगराळ, नक्षलग्रस्त,दुर्गमभागात सुद्धा आपण या क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी खेचून आणला आहे,


जसे आदिम, 5054,सोमनुर पर्यटन,नगरपंचायत इ. तसेच नॅशनल हायवे रस्त्याचे  भूमिपूजन सुद्धा लवकरात लवकर करण्यात येईल, सरल ॲप,नमो ॲप याचा प्रशिक्षण, धन्यवाद मोदीजी पत्र,फ्रेंड ऑफ बीजेपी अशा विविध संगटनात्मक विषयांवर पदाधिकारी -कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.आणि दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यासंदर्भात सर्वांनी बुथनिहाय नियोजन करावे अशी सुचनाही बैठकीदरम्यान केले.


याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दामोदर अरिगेलवार, कृ.उ.बा. समितीचे उपाध्यक्ष सतिश गंजीवार,भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी  युवा मोर्चा नेते संदीप राचरलावार,युवा मोर्चा अध्यक्ष राजेश संतोषवार, बुथ प्रमुख,शक्तीकेन्द्र प्रमुख,विस्तारक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !