साहेब लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळेल का हो. ?

साहेब लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळेल का हो. ? 


एस.के.24 तास


भंडारा  : (नरेंद्र मेश्राम) लाखनी तहशिल मध्ये कृषी विमा भरणारे एकूण शेतकरी संख्या -24448 आहेत.त्यांपैकी फक्त 563 शेतकरी कृषी विमा योजनेनुसार तक्रार दाखल केली आहे म्हणजे 2%. यामध्ये काही पालांदूर भागातील अंदाजे 90 शेतकरी संख्या कृषी विमा लाभार्थी आहेत.माझ्या शेतीचा कृषी विमा काढलेला असून सर्व प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.परंतु आजही विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही.



महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात पावसाळी पीक नुकसान धारक सर्वात जास्त शेतकरी आहेत.तलाठी यांच्या निरीक्षण, कृषी अधिकारी आणि विमा कंपनी यांच्या पाहणीनुसार साजा क्षेत्रात 500हेक्टर शेतजमीन पैकी 300हेक्टर शेतजमीन नुकसान बाधित झालेली आहे असे अहवाल कृषी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले गेले आहे.मी आणि माझ्या शेताशेजारी 70% ते 90% शेतपीक नुकसान बाधित आहेत.पीक विम्याची रक्कम शेतक-यांनी भरली असून सुद्धा केवळ 2% पीकविमा लाभार्थी शेतकऱ्यांना कंपनी आणि सरकार यांनी पीक विमा का बरं दिला नाही ?असा प्रश्न शेतकरी म्हणून करीत आहेत.खाणा-यांचा पोट भरो,उडविणारे उपाशी मरो.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !