भंडारा,गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पत संस्था मोहाडी चे कार्यकारी मंडळ गठीत.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे च्या आदेशानुसार भंडारा -गोंदीया जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित मोहाडी चे संचालक मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली या व्यवस्थापक मंडळात बहुमताने अध्यक्ष स्थानी मदन बलदेव मेश्राम. उपाध्यक्ष म्हणून विजय आसाराम बांगडकर कार्यवाह मोरेश्वर हंसराज पटले.सहकार्यवाह मारोती तिमा मेश्राम संचालक म्हणून परिवर्तन पॅनल चे नरेश भुरे, सुनीता ढेंगे, वर्षा मेश्राम,डोलिराम गिऱ्हेपुंजे, देवनाथ लांजेवार,अमोल जांभुळे, रवींद्र मेश्राम, धनराज कवाने संदीप वहीले, प्रफुल देशमुख, चरणदास भिवगडे, दिपक रहांगडाले. 16 संचालकाच्या निवडणुक प्रक्रियेत परिवर्तन पॅनल ला प्रत्येकी 12मते पडली, तर विरुद्ध जागृती पॅनल च्या उमेदवारांना प्रत्येकी चार मते पडली.
या निवडणुकीत यशस्वी संचालक आपल्या यशाचे श्रेय परीवर्तन पॅनल चे मुख्य मार्गदर्शक धनंजय बिरंनवार, माजी संचालक यादवराव गायकवाड,लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे शरद बडवाईक,माध्यमिक विभाग प्रमुख सुनील खिलोटे,जे.के.विद्यालया चे सुधाकर ब्राह्मणकर,गोंदिया जिल्हा प्रमुख असीम बॅनर्जी,, ग्यानचंद जांभूळकर, नीलकंठ मते,लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्राचार्या . मंदा चोले, जिल्हापरिषद ज्युनियर कॉलेज प्राचार्या केशर बोकडे, सुरेंद्र पाटील, मारोती बालपांडे,गोपाल लांजेवार, तायडे मुख्याध्यापक भरत सातपुते ,यांना दिले आहे.