गडचिरोली पोलीस भरतीत बोगस झाडे कुणबी उमेदवारांचा समावेश. ★ बोगस प्रकल्पग्रस्तांप्रमाणे कारवाईची अपेक्षा.


गडचिरोली पोलीस भरतीत बोगस झाडे कुणबी उमेदवारांचा समावेश.


★  बोगस प्रकल्पग्रस्तांप्रमाणे कारवाईची अपेक्षा.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात झाडे कुनबी ही जात धनगर समाजाची खोटे दाखले घेऊन पोलीस भरतीत घुसखोरी करीत असतांना बोगस प्रकल्पग्रस्तांवर धडक कारवाई करणारे पोलीस अधीक्षक या प्रकरणाकडे का दुर्लक्ष करीत आहेत.? असा संशयित प्रश्न धनगर समाज संघटना करीत असून प्रकल्पग्रस्तांप्रमाणे झाडे कुणबी या बोगस उमेदवारांवर कारवाईची अपेक्षा धनगर समाज करीत आहे.

गडचिरोली पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविणाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी बडतर्फीची कारवाई करीत फौजदारी गुन्हे दाखल केले त्यामुळे राज्यात खळबळ माजली असून व पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. याच प्रकारची बोगसगिरी झाडे कुणबी जातीतील लोक पोलीस भरतीत करीत आहेत.

झाडे कुणबी हे भटक्या जमाती क प्रवर्गात मोडत नसतांना नामसदृश्यतेचा फायदा घेत धनगर समाजातील झाडे या तत्सम जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवीत मागील 2021 च्या पोलीस भरतीत तीन बोगस झाडे कुणबी उमेदवारांची निवड करण्यात आली. 

त्यावर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी व धनगर संघटनांनी आक्षेप घेऊनही रुजू करून घेण्यात आले पण सहा महिन्याचा काळ लोटून गेला असतानाही अजुनपर्यँत जात वैधता प्रकरण पाठविले नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक हे या बोगस उमेदवारांना अभय देत असल्याचा आरोप होत आहे.

सन 2022 पोलीस भरतीतील भटक्या जमाती क ची पहिली यादी प्रसारीत झाली असून या यादीतही अनेक बोगस झाडे कुणबी आहेत. या यादीवरही आक्षेप घेत उमेदवारांची पूर्वीच जात वैधता अवैद्य ठरविण्यात आली असल्याचे पुरावे सादर केले आहेत.मात्र काहीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.या प्रकरणाकडे पोलीस अधीक्षक दुर्लक्ष करीत असल्याने पुढे धनगर समाज संघटना आक्रमक भूमिका घेईल असे वातावरण आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !