लाचखोर महिला वनरक्षकास लाच घेतांना पतीसह अटक ★ सावली तालुक्यात लाचलुचपत विभागाची कारवाई.



लाचखोर महिला वनरक्षकास लाच घेतांना पतीसह अटक 


★ सावली तालुक्यात लाचलुचपत विभागाची कारवाई.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


सावली - अतिक्रमित जमिनीवर रोपवन ण करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महिला वनरक्षक शारदा कुळमेथे व तिच्या पतीस चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. सावली तालुक्यातील उपरी वन बीटातील घटना आहे.

तक्रारदाराच्या वडिलाने वनजमिनीवर अतिक्रमण केले होते.ती जमीन सोडून वनविभागाकडून रोपवन करण्यासाठी वनरक्षक महिलेने दहा हजाराची लाच मागितली होती. 

तडजोड करून पाच हजार देण्याचे ठरले परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानुसार सापळा रचून वनरक्षक,शारदा कुळमेथे व तिचा पती संजय आतला यास रंगेहात लाच घेतांना अटक केली.

ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक,अविनाश भामरे,पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्यासह नरेश नन्नावरे,रवी ढेंगळे,वैभव गाडगे,पुष्पा काथोडे,सतीश सिडाम यांच्यासह चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !