प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या.
नितेश मँकलवार!उपसंपादक
मुल : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने मूल मध्ये खळबळ उडाली आहे. गळफास लावून आत्महत्या करणा-या मृतकाचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय 45 रा.मूल वार्ड क्रं.11 असे आहे.
शेजारी राहणा-या एका विवाहीत असलेल्या शबाना नामक मुलीशी मृतकाचे ब-याच वर्षापासून प्रेमसंबध होते. त्यामुळे मृतकाच्या घरी नवरा बायको मध्ये नेहमी भांडणे व्हायची. दोघांनाही एक एक मुलगा असून यांच्या प्रेमसंबधाचीं नेहमीच चर्चा व्हायची.सोमवारी दुपारी तणावामध्ये असताना बंडू निमगडे यांने एका बाटलीमध्ये पेट्रोल आणून प्रेमसंबध असलेल्या शबाना नामक प्रेयसीच्या घरी जावून तिच्या अंगावर पेटोल टाकले. तिला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच तणावामध्ये असताना निमगडे यांने वार्ड क्र.11 मधील राहत्या घरी येवून गळफास घेवून आत्महत्या केली.ही घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडल्या. पेटोल टाकून जखमी झालेल्या शबाना नामक महिलेला मूल मध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी भेट दिली.जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याने मृतक बंडू निमगडे यांच्या विरूदध 307 चा गुन्हा दाखल झाला असून आत्महत्या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास प्रभारी ठाणेदार बन्सोड हे करीत आहेत.