ग्रा.पं.नवेगांव पांडव येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.



ग्रा.पं.नवेगांव पांडव येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती व  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.


एस.के.24 तास


नागभीड : ऐतिहासिक निर्णय जगामध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील  मिशिगन राज्यांने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता साठी मानव कल्याणकारी महान कार्याची दखल घेऊन ९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ Social Equity week समता , स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे हार्दिक अभिनंदन . अँड.शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंचा ग्रामपंचायत नवेगाव पांडव ह्या बोलल्या कि आयुष्यात जेव्हा कधी संघर्ष अती होऊ लागतो.जेव्हा कधी जगण्याची वाट अस्पष्ट दिसू लागतो. आपल्यातच स्वातंत्र्यचा लगाम दुसरे कुणी हाती घेऊ लागते.तेव्हा कळतं तुमचं आयुष्यातला योगदान किती अमुल्य आहे.

मुक्त श्वासाची, मुक्त निर्णयाची किंमत स्वातंत्र्य गमावून जेव्हा केवळ स्त्री म्हणून चुकवावी लागते.तेव्हा ते पटत नसते.लढलात स्त्रीच्या हक्कासाठी.नाही तर आज ती गुलाम राहीली असती.तशी गुलामी अजून या सुसंस्कृत भारतातून नष्ट नाहींच. स्त्री हक्कासाठी आपण कायदेशीर कार्यकतुत्व निर्माण केले आणि केवळ हिंदू कोड बिल साठी स्वतंत्र भारताच्या कायदेमंत्री पदांचा राजीनामा दिला.यातून निस्वार्थ मानवता हे मुल्य किती मोठे आहे हे आपण दाखवून दिले.बाकी समाज स्पृश्य अस्पृश्य म्हणून तुमच्या कार्याचे विच्छेदन करू शकेल. पण हा मानव हा कशातच गुंतवणू पडलेला नसतो.तो फक्त विचार आणि त्यांच्या कार्याने लोकांच्या हृदयावर राज्य करतो.

उपस्थित माजी उपसभापती पं.स.नागभिड  तथा विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत नवेगाव पांडव विजयजी बोरकुटे,मा.रितेशजी पांडव  सौ.कल्पनाताई सुरेश नवघडे,सौ. निरंजनाताई सोनटक्के,सौ मिराताई मशाखेत्री सदस्य ग्रामपंचायत नवेगाव पांडव, प्रतिष्ठित नागरिक कृतीशील वेळोवळी गावाला मदत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक  करणार्या  नेहमीच तत्पर कार्यशील आमच्या मार्गदर्शक श्रिमती,शारताताई वासुदेव नवघडे,प्रतिष्ठित नागरिक माजी मुख्याध्यापक बंशीलाल चुर्हे सर ने.ही विद्यालय नवेगाव पांडव.प्रतीशष्ठीत नागरीक माजी शिक्षण दिवाकर नवघडे सर,मान.नरेंद्र चुर्हे सर ने.ही विद्यालय, नवेगाव पांडव.शिव क्रीडा संकुलन चे तरूण तडफदार कार्यशील तरुण  सम्राट पांडव, मयुर वाटकर, आशीष बोरकुटे, रोहीत पांडव, कर्मचारी श्री.विजय श्रीराम नवघडे,श्री.अतुल दादाजी पांडव,उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !