समाजरत्न कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात.

समाजरत्न कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात. 


राजेंद्र वाढई!उपसंपादक


राजुरा : काल दि.25/04/2023 ला राजुरा येथे समाजभूषण, समाजरत्न मा. कृष्णाजी भोयर यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्यांची पत्नी सौ,बयनाबाई यांचा 75 वा व मुलगी श्रीमती सुनीता जुनघरे यांचा 50 वा वाढदिवस ही त्याच वेळी संपन्न झाला. 



कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णाजी नागपुरे (अध्यक्ष,चं.जि.भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर ) हे होते. मंचावर राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार वामनराव चटप,कळमना चे सरपंच,ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई,भोई संघटनेचे सचिव देवराव पिंपळकर,उपाध्यक्ष रमेश नागपुरे, गजानन उमाठे व इतरही सामाजिक नेते आसनस्थ होते. 


या प्रसंगी 400 च्या जवळपास बंधू -भगिनी व बाल मंडळी उपस्थित होती. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तर्फे 40 च्या वर समाज कार्यकर्त्यांचा त्यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. आमदार सुभाष धोटे यांनी "इंडिया बुक आफ रेकार्ड "विजेते श्री कृष्णाजी नागपुरे यांचा सत्कार केला. तसेच श्री मोरेश्वर खेडेकर,मारोतराव कापटे, रमेश नागपुरे,सुवर्णा कामडे, गजानन उमाठे यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व वक्त्यांनी भोयर सरांचा,त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.


कार्यक्रमाचे संचालन प्रा.वागधरे,गजानन उमाठे यांनी केले,तर आभार प्रदर्शन रमेश नागपुरे यांनी केले.भोयर सरांच्या मुलींनी,जावयानी,नातू,नाती, गजानन उमाठे,मोरेश्वर खेडेकर व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून हा वाढदिवस सोहळा यशस्वी केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !