बुथप्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख हा भारतीय जनता पक्षाचा कणा व आत्मा आहे. - खासदार अशोकजी नेते
एस.के.24 तास
आल्लापल्ली : दिनांक १५ एप्रिल २०२३ आलापल्ली - खासदार अशोकजी नेते यांनी आलापल्ली येथे बुथ सशक्तीकरणाचा तालुका निहाय बुथ आढावा घेत एटापल्ली ६५,भामरागड २८, मुलचेरा ४२,अहेरी ९३ याप्रमाणे बूथ रचना सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत व सर्व समावेशक कशी असली पाहिजे, बुथ जीतो चुनाव जीतो याप्रमाणे तसेच सरल ॲप,नमो ॲप,कशा पद्धतीने डाऊनलोड करुन कश्या पद्धतीने हाताळला जातो,याविषयी सरळ व सोप्या पद्धतीने विस्तृत आणि सविस्तर माहिती खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी दिली.
तसेच बुथप्रमुख, शक्ती केन्द्र प्रमुख आढावा बैठकित खासदार अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करतांना बुथ प्रमुख,शक्ती केंद्र हा भारतीय जनता पार्टीचा कणा व आत्मा आहे. या कण्याला शक्ती द्यायचं काम शक्तीकेंद्र प्रमुख करित असतात. भारतीय जनता पक्षाला एक शक्तिशाली आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवण्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. यासाठी केंद्र प्रमुख आणि बूथ स्तरावरील कार्यकर्ते हा भारतीय जनता पक्षाचा कणा व आत्मा आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, विस्तारक तालुका आढावा बैठकीत केले.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, भाजपाचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,जिल्हा संघटन महामंत्री,रविंद्र ओल्लालवार, प्रदेश सरचिटणीस एसटी मोर्चाचे प्रकाश गेडाम,प्रदेश सदस्य तथा गडचिरोली युवा मोर्चाचे जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे,प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे,आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत,जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकंनपल्लीवर, सागर डेकाटे,युवा मोर्चा चे प्रतिक राठी, ऐटापल्ली तालुकाध्यक्ष विजय नरलावार,मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता,भामरागड प्रभारी तालुकाध्यक्ष सुनिल बिशवास, सुभाष गणपती,शहराध्यक्ष सम्राट मल्लिक,जिल्हा महामंत्री भारतीताई ईषटाम,अहेरी ता.महामंत्री पोशालू चुधरी,शक्तिकेंद्र प्रमुख सचिन कर्मे,शक्तीकेंद्र प्रमुख अशोक बढाल, शक्तीकेंद्र प्रमुख विजय विश्वास,बुथप्रमुख राकेश पुंघाटि, बुथ प्रमुख जाधव हलदार,तसेच समस्त शक्ति केंद्र प्रमुखअनेक भाजपा पदाधिकारी,बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख,कार्यकर्ते, आढावा बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.