ब्रम्हपुरी आगाराच्या लांब पल्याच्या गाड्या सुरू ; प्रशांत डांगे यांच्या हस्ते शुभारंभ.



ब्रम्हपुरी आगाराच्या लांब पल्याच्या गाड्या सुरू ; प्रशांत डांगे यांच्या हस्ते शुभारंभ.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१७/०४/२३ अनेक महिन्यांपासून ब्रम्हपुरी आगाराच्या लांब पल्याच्या गाड्या बंद होत्या.त्यामुळे प्रवाश्यांना अडचणी निर्माण होत होत्या.सध्या लग्न सिझन व उन्हाळा सुरू झाला त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता तसेच आगाराचे उत्पंन वाढावे यासाठी ब्रम्हपुरी आगार व्यवस्थापक नितीन झाडे यांनी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या प्रयत्नास यश आले आणि ब्रम्हपुरी आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यास परवानगी मिळाली.


दिनांक १५ एप्रिल रोजी ब्रम्हपुरी शेगाव,ब्रम्हपुरी वाशिम, ब्रहापुरी वर्धा, ब्रम्हपुरी हिंगणघाट अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या.लांब पल्ल्याच्या गाड्या चा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार प्रशांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी प्रशांत डांगे यांनी चालक , वाहक यांना दुपट्टा देऊन सन्मान केला.


या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक नितीन झाडे, विश्वास मेश्राम,तसेच चालक,वाहक तसेच प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ब्रम्हपूरी वाशिम बससेवेचा शुभारंभ ब्रम्हपूरी ते वाशिम ही बससेवा  प्रवाशच्या सेवेत दि.16 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे.ब्रम्हपूरी व इतर तालुक्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे. सदर बस हि ब्रम्हपूरी येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल तर वाशिम येथून सकाळी 8.00 वाजता सुटेल.सदर बस चे थांबे नागभिड,सिंदेवाही,मूल,चंद्रपूर,वणी,मारेगांव,यवतमाळ,दारव्हा, कारंजालाड,मंगरुळपीर मार्गे वाशिम येथे पोहचेल. 


श्री प्रशांत डांगे.सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार,व श्री नितीन झाडे आगार व्यवस्थापक,ब्रह्मपुरी यांनी या बसचे चालक श्री.अविनाश उंबरकर व वाहक श्री.अब्दुल वसीम यांचा दुपट्टा देऊन सत्कार करुन  बस मार्गस्थ करण्यात आली. तसेच ब्रम्हपूरी-शेगांव, सकाळी 8.00 वाजता ,ब्रम्हपूरी- वणी सकाळी 7.00  वाजता  या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलेला असून याचा जनतेनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री. नितीन झाडे. आगार व्यवस्थापक ब्रम्हपूरी यांनी केले आहे.


लांब पल्ल्याचा गाड्या सोडण्यात आल्या असून प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन आगार व्यवस्थापक नितीन झाडे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !