सावित्रीबाई फुले मुळेच महिला शिकल्या. - डी.जी रंगारी
★ महालगाव येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिकवलं व या देशातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले नावारुपास आले सावित्रीबाई फुले यांनी दगड धोंडे खाऊन अंगावर शेण खाऊन शिक्षणाचा व्रत कधी सोडले नाही आणि म्हणूनच आज महिला अतिशय उच्चस्त पदावर विराजमान झालेले आहेत हे सर्व देण सावित्रीबाई फुले यांची आहे.
त्यामुळे सावित्रीबाई फुले सारख्या महिलांनी न घाबरता महात्मा ज्योतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांचे विचार बहुजन समाजा पर्यंत पोहोचवण्याचे काम,धडाडीचे काम ,लोकांना जागृत करन्याचे काम फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम आजच्या महिलांनी करावं आणि त्यांच्या सोबतच पुरुषांनी सुद्धा हातभार लावा असे मत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डी जी रंगारी यांनी प्रमुख वक्ते म्हणून महालगाव येथील सावित्रीबाई फुले च्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे फुळुक्के सर होते तर उद्घाटक पाहुणे म्हणून समता सैनिक दलाचे भंडारा जिल्ह्याचे प्रवक्ता शि डी गवरे, सरपंच किशोर नंदकिशोर कावळे, पंचायत समिती सदस्य करुणाताई वालोदे , तंटामुक्त अध्यक्ष शेंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येते हा कार्यक्रम त्रीबुद्ध विहार समिती तर्फे घेण्यात आले पुण्यावरून आलेले गव्हारे सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबासाहेब समाज भूषण पुरस्कार डी जी रंगारी, समता सैनिक सिद्धलाचे गजेंद्र गजभिये सरपंच नंदकिशोर कावळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
सरपंच नंदकिशोर कावळे यांनी जो रेगुलर टॅक्स भरेल त्यांचे हस्ते 26 जानेवारीला ध्वजारोहण करू व डॉ बाबासाहेबांचे विचार आम्ही विसरू शकणार नाही असे मत व्यक्त केले.
ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा दान दिला अशा गोपीचंद गजभिये व दापत्य यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष चिरंजीव बारसागडे यांनी केले तर आभार ज्योती शहारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ती रत्न बुद्ध विहार महालगाव येथील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.