अड्याळचा घोळा उत्सवाचा समारोह मान्यवरांच्या उपस्थित संपन्न.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : दि.06.04.2023 ला अडयाल येथील घोडायात्रे निमित्त श्री रामनवमी ते श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात आज समारोपीय कार्यक्रमात श्री ग्रामविकास एकात्मता भागवत समिती आणि श्री हनुमान देवस्थान कमिटी,आणि ग्रामवासी यांच्या वतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ह.भ.प.संतोषानंद शास्त्री महाराज,श्रीजी धाम वृंदावन यांच्या अमृत तुल्य वाणीतून संपन्न झाला.
आजच्या गोपाल काला, सर्व धर्म सामुहिक विवाह सोहळा,महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी साहेब,विशेष अतिथी आमदार नरेंद्रजी भोंडेकर साहेब,भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर साहेब,पोलीस अधीक्षक लोहित मतानी ,माजी आमदार डॉ.हेमकृष्णाजी कापगते साहेब ,जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे साहेब,जिल्हा परिषद सदस्या सुवर्णताई मुंगाटे,प स सदस्या सौ सीमा गिरी,DFO गवई साहेब,माजी जि.प.सदस्य युवराज भाऊ वासनिक साहेब,माजी जि प सदस्य देवेन्द्र भाऊ हजारे साहेब,सरपंच शिवशंकर मुंगाटे,उपसरपंच शंकर मानापुरे , श्री, हनुमान देवस्थान कमेटी चे अध्यक्ष निलकंठ गभने हे होते,सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत समितीचे अध्यक्ष डॉ. उल्हासजी हरडे साहेब यांनी केले,सर्व अतिथींच्या सदर कार्यक्रमाच्या अनुसंगाने जमलेल्या भावीक भक्तांना मार्गदर्शन केले,,त्यानंतर सामुहिक विवाह सोहळा पार पडला, कार्यक्रमाचे संचालन खंडाईत सर यांनी तर आभार प्रदर्शन अमोल उराडे यांनी केले,नंतर महाप्रसादाला सुरवात झाली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व युवकांनी, ग्रामस्तानी मेहनत घेतली,यात्रेच्या सुरवातीपासून तर आज समारोपा पर्यंत अडयाल पोलीस स्टेशन चे ठाणेदार API प्रशांत मिसाळ साहेब यांनी योग्य नियोजन करून शांतता व सुव्यवस्था ठेवली.