दिंडी,भजनाने नवरदेव पोहोचला वधू मंडपी.

दिंडी,भजनाने नवरदेव पोहोचला वधू मंडपी.


सहसंपादक श्री,अमरदीप लोखंडे


ब्रह्मपुरी : दिनांक,२६/०४/२३ आवळगांव येथील कुणाल रूपचंद गिरडकर या ‌ इंजिनीयर मुलाने गोविंदपूर येथील रागिनी नंदकिशोर मस्के या मुलीशी अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला.त्याने आपली वरात गाडी, घोड्यावर थाटामाटात साज न करता  काढता दिंडी,भजनाने पायी चालत  वधू मंडपी नेली आणि जनतेसमोर एक नवीन आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला.


श्री केशवराव बानबले उर्फ अम्मा भगवान,गुरुदेव मंगरे बंडू नरुले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या भारतात बंधुभाव रचित भजनाच्या चालीवरील 

एस.के.24 तास न्युज चॅनल चे सहसंपादक श्री,अमरदीप लोखंडे यांनी नव्याने तयार केलेले आशीर्वाद अक्षदा उधळून मंगलाष्टकांनी लग्न लावला. 


कुणाल हा सिविल मध्ये इंजिनियर असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भक्त.त्याला भजन गायनाची मोठी आवड आहे.त्याच्या लग्नाची वरात दिंडी, भजन ,फुगडी खेळत ज्या पद्धतीने  वधू मंडपी नेली तिचे कौतुक वर - वधू कडील पाहुणे मंडळी आणि गोविंदपूर वासियांनी तोंड भरून केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !