भंडारा,गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पत संस्थेवर परीवर्तन पॅनल चा झेंडा.
एस.के.24 तास
भंडारा : भंडारा,गोंदिया जिल्ह्यातील जिल्हापरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य, अधीव्याख्याता व शिक्षक यांनी संघटीत पणे उभारलेली भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित मोहाडी .या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि.7 एप्रिल 2023रोज शुक्रवारला घेण्यात आली .या निवडणुकी चा निकाल निबंधक कार्यालयांनी मोहाडी येथे निकाल घोषीत करण्यात आला.हया निवडणूकी मध्ये दोन पॅनल लढविण्यात आल्या नवीन गटाची परीवर्तन पॅनल व जुण्या गटातील जागृती पॅनल मध्ये निवडणूक लढन्यात आली.
परिवर्तन पॅनल चे जिल्हा पातळीवरील उमेदवारांमध्ये एस. सी . प्रवर्गातून मदन मेश्राम, इतर मागास प्रवर्गातील नरेश भुरे, एन टी व्हीजे मधून मारोती मेश्राम, जिल्हा महीला प्रतिनिधी राखीव उमेदवार म्हणुन सौ.सुनीता ढेंगे, कु. वर्षा मेश्राम तसेच भंडारा झोन मधून विजय कुमार बांगळकर, लाखणी झोन मधून डोलिराम गिऱ्हेपुंजे साकोली झोन मधून देवणाथ लांजेवार, लाखांदूर, झोन मधून अमोल जांभुळे, रवींद्र मेश्राम, तिरोडा मधुन मोरेश्वर पटले, अशे परिवर्तन पॅनल चे 11उमेदवार स्पष्ट बहुमताणे निवडून आले असून भंडारा गोंदिया जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित मोहाडी या पत संस्थेवर आपला झेंडा उभारला आहे.
निवडणुकीत जागृती पॅनलच्या तीन व दोन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. परिवर्तन पॅनल चे नेतृत्व धनंजय बिरणवार,शरद बडवाईक,सुनील खीलोटे,सुधाकर ब्राह्मणकर,यादवराव गायकवाड, ग्यांनचंद जांभूळकर,गोपाळ लांजेवार,गोंदियाचे नायडू यांच्या नेतृत्वात लढली गेली. या निवडणुकित विजयी पॅनल चे लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या प्राचार्या मंदा चोले, जिल्हापरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरठी च्या मुख्याध्यापिका केशर बोकडे, यांनी अभिनंदन केले.