व्हॉइस ऑफ मीडियाची तालुका कार्यकारिणी जाहीर.
★ तालुका अध्यक्षपदी प्रशांत राऊत तर डिजिटल मीडियाच्या अध्यक्ष पदी विनोद चौधरी यांची निवड.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रम्हपुरी : सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची ब्रम्हपुरी तालुका कार्यकारीणी 23 एप्रिलला स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे जाहीर करण्यात आली.
व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस दीपक पत्रे यांच्या उपस्थितीत,व्हॉइस ऑफ मीडिया चे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष प्रशांत राऊत व डिजिटल विभागाचे तालुका अध्यक्ष विनोद चौधरी यांनी येथील शासकीय विश्रामगृहात जाहीर केली.
ब्रम्हपुरी तालुक्याच्या मुख्य कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून प्रा.संतोष पिलारे, उपाध्यक्ष अनुप पानतावणे,दत्तात्रय दलाल,सरचिटणीस महेश पिलारे,सह सरचिटणीस प्रशांत डांगे,अमर गाडगे,खजिनदार/कोषाध्यक्ष प्रवीण मेश्राम,कार्यवाहक विनोद डोनाडकर,सह कार्यवाहक रवींद्र चामलवार,संघटक गोवर्धन डोनाडकर, नंदकिशोर गुड्डेवार,प्रसिद्धी प्रमुख रुपेश देशमुख, राहुल भोयर,सदस्य सचिन बदन,सुरज डोनाडकर, लेकराम डेंगे, क्रिष्णा वैद्य,गुलाब ठाकरे,रोशन मदनकर यांची निवड करण्यात आली असून यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.