नागसेन बुद्ध विहार जेवनाळा येथे डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त नागसेन बुद्ध विहार जेवनाळा येथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जलोषात जयंती साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ज्ञानेश्वर खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा उजाळा केला.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी विनायक बुरडे यांनी बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करून संघटित होऊन समाज निर्मिती करावं असे विचार मांडले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र गडपायले यांनी बौद्ध धम्माची शिकवण व समाजाला याची असलेली गरज या वर मार्गदर्शन केले.या प्रसंगी जयसिंग राठोड,प्रशांत गीरहेपुंजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुप्रिया रंगारी यांनी केले.या प्रसंगी सरपंच सौ वैशाली बुरडे,महादेव रंगारी,रेखाताई ग डपायले किशोर नागदेवे ,वीणाताई सेलोकर,चैतन्यास्वर कडुकार व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.