जोतिराव फुले यांचे विचार समाजाला आजही दिशादर्शक. - डॉ.सुरेश खोब्रागडे

जोतिराव फुले यांचे विचार समाजाला आजही दिशादर्शक. - डॉ.सुरेश खोब्रागडे


एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील दाम्पत्याने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करीत शोषित,वंचित,पीडित शूद्र,अतिशूद्र वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवीत  वंचितांच्या कल्याणाचा मूलमंत्र समाजाला दिला . आजही त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक ठरत असून त्यांच्या विचारानुसारच समाज एका निश्चित दिशेने जाऊ शकतो . प्रवाहाबरोबर सगळेच जातात परंतु प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन प्रसंगी अन्याय -अत्याचाराला वाचा फोडताना कितीतरी संकटांना धूडकावून लावत या दाम्पत्याने एक वेगळी वाट निर्माण करून दिली . आज त्यांच्या विचारांची कास धरून समाजाला प्रवाहित करणे गरजेचे आहे. 


एशियन न्यूज चॅनलच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार पुढे नेण्याचे काम होईल असे विचार लाखनी येथील  प्रसिद्ध कवी,नाटककार डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त एशियन न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आणि भीम पर्व या बुद्ध भीम गीताच्या चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून येथील होमगार्ड  परेड ग्राउंडवर आपले विचार व्यक्त केले .अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ. हेम कृष्ण कापगते होते तर अतिथी म्हणून डी.एफ. कोचे ,डॉ. शंकर बागडे , सामजिक कार्यकर्ते डी. जी. रंगारी, रेखा वासनिक, वंचीत आघाडीचे धनपाल गडपायले, दिलिप  वानखेडे,मनोज कोटांगले ,शीलकुमार वैद्य आणि विलास मेश्राम आदी मान्यवर विचार मंचावर विराजमान होते .याप्रसंगी डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ.शंकर बागडे, रेखा वासनिक यांनी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकार्यावर विलक्षण प्रकाश पाडला .एशियन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून जे कार्य डी.जी. रंगारी करीत आहेत त्या कार्याची स्तुती करीत भावी वाटचालीसाठी  सर्वांनी शुभेच्छा दिल्या. डी.जी. रंगारी यांनी प्रास्ताविकातून एशियन न्यूज चॅनेलच्या वाटचालीबद्दल आणि भीमपर्व या चॅनलच्या निर्मिती बद्दल आपली भूमिका विषद केली. समाजातील विविध समस्या , प्रश्न सोडविण्यासाठी आपले चॅनल तत्पर असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.


रात्री विदर्भातील सुप्रसिद्ध गायिका तनुजा नागदेवे यांच्या कव्वाली आणि प्रबोधनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साकोली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.जी.रंगारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एशियन न्यूज चॅनेल आणि भीमपर्व चॅनलचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रषिक मोटघरे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम यांनी पार पाडला. 


यशस्वी करण्याकरता अमित नागदेव श्रावण  नंदेश्वर,जगदिश रंगारी,शितल नागदेवे,स्वर्णमाला गजभिये,यादोराव गणवीर, मंजूषा खांडेकर, राजश्री भैसारे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !