पेलोरा येथे श्रीदत्त मंदिराचे लोकार्पण ; संत बाजीराव महाराज, जगन्नाथ महाराज, दत्तात्रय भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न. ★ सहयोग देणा-या मान्यवरांचा सत्कार संपन्न.

पेलोरा येथे श्रीदत्त मंदिराचे लोकार्पण ; संत बाजीराव महाराज, जगन्नाथ महाराज, दत्तात्रय भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा  संपन्न.


★ सहयोग देणा-या मान्यवरांचा सत्कार संपन्न.


एस.के.24 तास


राजुरा : राजुरा तालुक्यातील पेलोरा येथे नव्याने निर्मित श्रीदत्त मंदिर देवस्थानचे लोकार्पण नुकतेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच मंदिरात परमहंस संत बाजीराव महाराज, सद्गुरु जगन्नाथ महाराज आणि दत्तात्रय भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

या  निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण  तथा ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित  या सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात श्रीदत्त मंदिराच्या उभारणीसाठी सहयोग देणा-या मान्यवरांचा सत्कार ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक धनराज पाटील  लांडे यांनी करून आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच सहयोग दात्यांचे आभार मानले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आजवर होऊन गेलेल्या महान  संतानी आपल्याला आत्मानात्मविवेक ज्ञान  दिलेले आहे. त्यातून  प्रेरणा घेऊन गावांसाठी  एकतेने झटले पाहिजे असे प्रतिपादन याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी केले.

    मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक व वस्तू स्वरूपात सहयोग देणा-या श्री. सुयश बोबडे, बिजाराम जुनघरी, दिनकर बोढेकर, दिनकर पिंपळकर,  संजय राव, वासुदेव शेरकी, बंडू राजुरकर, गणेश राजूरकर, डॉ.विश्वास, लहानुबाई आत्राम, साईनाथ बोंडे ,आनंद वांढरे, हरिश्चंद्र उपरे, गोपीनाथ टोंगे ,गणपत अहिरकर, वारलू भोयर, बंडू गौरकर, प्रमोद खुजे, अरुण धोटे,  हरिश्चंद्र झाडे, विठ्ठल बोढेकर, राजू पिंपळशेंडे , गणपत कायरकर ,तानाजी बुरान, राजू लांडे, देविदास लांजेकर, रवींद्र लांडे ,सतीश चिकनकर, वामन बोढेकर, प्रभाकर बोढेकर,  सुरेश गज्जलवार, बबन थेरे,  मेघराज बोढेकर ,रामदास उपरे ,बंडू अडबाले, मारोती उरकुडे, चंद्रभान गौरकर, नामदेव कायरकर , गणपती कायरकर, विलास झाडे ,ताराबाई झाडे  तसेच सार्वजनिक शारदा महिला मंडळ , शंकर पट आयोजन समिती पेलोरा आदींचा मानवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.  समारोपीय कीर्तन आळंदी चे नऊ वर्षीय माऊली महाराज जाहुरकर यांनी प्रस्तुत केले.  तर ग्राम प्रदक्षिणा दिंडीत  पदावली भजन मंडळ मन्यारपुर ,मांडवा, रामपूर, जैतापुर, गडचांदुर, पेलोरा येथील भजन मंडळांनी उस्फूर्त सहभाग घेतला. तर साप्ताहिक ज्ञानेश्वरी पारायण व ग्रामगीता वाचन सेवाकार्यात गुणवंत गावंडे ,  मुरलीधर माहुरे, घूमन्ना रेड्डी,  विठ्ठल थाटे , डॉ.उदार, दत्ताभाऊ ठाकरे, मसे महाराज, विलास कुळसंगे, बालाजी महाराज, श्याम माहुरे, खुशाल गोहोकर, एकनाथ गोहोकर , सुरेश बेले, दिवाकर वाघमारे, गुलाब  दरेकर ,बोबडे महाराज आदींनी आपल्या सेवा अर्पण केल्यात तर या  सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सुनील खुजे ,उत्तम लांडे, दादाजी कळसकर, गिरीश पानघाटे, सतीश पानघाटे, रामचंद्र राजुरकर, केशव अडबाले , विठ्ठल अडबाले, विठ्ठल दाते ,पवन झाडे, विलास नामदेव झाडे, जीवन झाडे, विठ्ठल आत्राम, प्रभाकर आत्राम, एकनाथ टोंगे, सुधाकर आत्राम, खुशाल मिलमिले, सुधाकर झाडे ,शुभम बोबडे, विनोद झाडे,लहू भोयर,अमोल गौरकर,अमोल बोबडे,  रामदास खुजे, अमरनाथ जीवतोडे,नारायण काकडे पुंडलिक काकडे आदींनी परिश्रम घेतले.महाप्रसाद वितरणानंतर सप्ताहाची सांगता झाली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !