रणमोचन येथील स्मशानभूमीच्या प्रलंबित रस्त्याचे भूमिपूजन.
एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,०६/०४/२३ हनुमान जयंतीचे औचित्य साधून रणमोचन येथील स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून ग्रामपंचायत च्या सरपंच नीलिमा नीलकंठ राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. गेल्या अनेक दिवसापासून रणमोचन येथील स्मशान भूमीत अंत्ययात्रा नेण्यासाठी अडचण निर्माण होत होती.
ही प्रलंबित मागणी वारंवार गावकऱ्यांच्या वतीने केली जात होती. मात्र बराच काळ लोटून सुद्धा ह्या रस्त्याची मागणी प्रलंबितच होती.अखेर हनुमान जयंतीला मुहूर्त सापडला आणि या प्रलंबित रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज सकाळी दहा वाजता संपन्न झाला.
यावेळी रणमोचन ग्रामपंचायतच्या सरपंचा नीलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, किन्ही येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच बाजार समितीचे माजी संचालक सुरेश दर्वे, विनोद दोनाडकर, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच योगेश पिलारे, ग्रामपंचायत सदस्य तथा रणमोचन ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय प्रधान, सुधीर राऊत, ग्रामपंचायतचे (पाणीपुरवठा विभागाचे शिपाई) हेमराज नाकतोडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.