मान.खासदार अशोक नेते यांची व्याहाड बुज.येथे सांत्वनापर भेट.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
सावली : दिनांक २३ एप्रिल २०२३ तालुक्यातील व्याहाड बुज.येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय.मनोहरजी मगनुरवार यांचे दि.२२ एप्रिल ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या संबधित सदर माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल व माजी बांध. सभापती जि.प चंद्रपुर संतोषभाऊ तंगडपल्लीवार,भाजपा महिला आघाडीच्या माधवीताई बाटवे यांनी खासदार महोदयांचे सहाय्यक तथा सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांना दुरध्वनीवरून दिली.परंतु खासदार महोदयांचा बाहेरचा दौरा असल्याने अंत्यविधीच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही.
तरी पण लगेचच दुसऱ्या दिवशी या संबंधित तात्काळ दखल घेत मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना खासदार अशोकजी नेते यांनी मगनुरवार यांच्या परिवारासोबत भावनिक संवाद साधत मागील पंधरा दिवसाच्या अगोदर मी व्याहाड बुज ला क्रिकेट खेळाच्या उद्घाटन प्रसंगी आलो त्यावेळी त्यांची माझी भेट झाली.बऱ्याच गपागोष्टी आपसात केल्या.
त्यांनी व्याहाड बुज येथे भारतीय जनता पार्टीला मोठा करण्याचं काम केल,नेहमी सतत पक्षाशी एकनिष्ठ राहले.त्यांच्या जाण्याने व्याहाड बुज येथे भारतीय जनता पार्टीमध्ये शोककळा पसरली आहे. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करून आम्ही तुमच्या सुखदुःखात सामील आहोत.तसेच काहि अडीअडचणी आल्यास आम्ही आपल्या सोबत आहोत.अशारितीने कुटुंबीयांचे सांत्वन करून भेट घेत आर्थिक मदत दिली.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोक नेते,तालुकाध्यक्ष अविनाश पाल,डॉ.तोडेवार साहेब,भाजपाचे जेष्ठ नेते सुरेशजी सुत्रपवार,माजी उपसभापती पं.स रविंद्र बोल्लीवार,ग्राम.प. सदस्य दिवाकर गेडाम, ग्राम.प.सदस्य धनराज गुरूनुले,भाजपा महिला आघाडीच्या नेत्या माधवीताई बाटवे,पोलीस मडावी साहेब,रविंद्र निकेसर,सुधाकर म्याकलवार,पत्रुजी गेडाम, सुधाकर गेडाम,रमेश पुण्यप्रेडिवार,प्रभाकर कांबळे, तसेच गावातील बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.