कोसंबी( खळसमारा) येथे महात्मा फुले जयंती धुमधडाक्यात साजरी.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१२/०४/२३ कोसंबी (खळसमारा ) येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची१९६वी जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गेडाम पोलीस पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंचा संगीताताई जेंगठे, केवळरामजी पाटील ठिकरे, वामनजी मोहुरले कुमदेवजी लेनगुरे उपस्थित होते.या कार्यक्रमाला कोसंबी गावातील संपूर्ण माळी समाज उपस्थित होते.
त्यांनी येणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची१३२वी जयंती पहिल्यांदाच मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्याचे ठरविले असून यापुढेही ती साजरी करण्यात येईल असे ठासून सांगितले.