सामाजिक कार्यकर्ता प्रशांत डांगे यांची मागणी.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे ) दिनांक,२७/०४/२३ ब्रम्हपुरी शहर शैक्षणिक सांस्कृतिक, क्रीडा,आरोग्य नगरी म्हणून नावारूपास आहे. त्याच बरोबर चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका असुन गडचिरोली, भंडारा , नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत वसलेले मध्यवर्ती शहर आहे.तसेच शहरात मोठी बाजारपेठ असून दळणवळणाची मुबलक साधने आहेत.त्यामुळे शिक्षणासाठी किवा आरोग्यासाठी ब्रम्हपुरी ला जिल्ह्याच्या बाहेरून नागरिकांची, विद्यार्थ्यांचे नेहमी जाणे येणे सुरू असते.
शहरात मोठ्या वाहनापासून तर लहान वाहनाची व नागरिकांची मोठी वर्दळ असते.शहराची वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाढती वाहनाची संख्या यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतुकीला डोकेदुखी ठरतअसते.
शहराच्या मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नसल्या कारणाने वाहनचालक नियमांचे काटेकोर पालन न करता बेसुमार, बेधुंद गाड्या चालवतात त्यामुळे अनेक अपघात झालेत किंबहुना अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले.
जर ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवली तर शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल तसेच शहरातील नागरिकांना नियम सुद्धा अवगत होतील तसेच पोलिस यंत्रणाचा ताण कमी होण्यास मदत होईल. यासाठी सबंधित विभागाने शहरातील मुख्य रस्त्याच्या चौकात ट्रॅफिक सिग्नल लावून द्यावे या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद Conference,तसेच पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत डांगे यांनी मागणी केली आहे.