अनिष्ठ प्रथांना दूर सारून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी :(अमरदीप लोखंडे) दिनांक,26/04/2023" समाजात अजूनही जुन्या रुढी,परंपरा, कर्मकांड आहेत.कोणतेही बाब स्वीकारतांना त्याची चिकित्सा व्हायला हवी.आपण विद्यार्थ्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन ' जादूटोणा विरोधी कायदा २०१३'चा प्रचार करावा आणि अनिष्ठ प्रथांना दूर सारून वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारावा!" असे बहूमोल विचार प्राचार्य डॉ डी. एच. गहाणेंनी व्यक्त केले.ते वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती सर्वे अभियानप्रसंगी बोलत होते.
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील लोकसंख्या शिक्षण मंडळ व वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती मंचातर्फे बोडेंगाव येथे सर्वे अभियान राबविण्यात आला.यात २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ धनराज खानोरकर, लोकसंख्या शिक्षण मंडळ कार्यक्रमाधिकारी डॉ.पद्माकर वानखेडे, सहकार्यक्रमाधिकारी डॉ भास्कर लेनगुरे,बंडू गेडाम, वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती मंच अध्यक्ष बालाजी दमकोंडवार, डॉ सुनिल चौधरी,विवेक नागभिडकर उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ पद्द्माकर वानखेडेनी तर आभार डॉ भास्कर लेनगुरेंनी मानले.यशस्वीतेसाठी संकेत मेश्राम,अंबिका मांढरे,भावना शेंडे,कविता राऊत, उत्तरा ठाकरेंनी परिश्रम घेतले.