' जयभीम ' हा बदलणा-या जगाचा सक्सेस पासवर्ड.! डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व्याख्यानमाला : संजय आवटेंचे प्रतिपादन.


 

' जयभीम ' हा बदलणा-या जगाचा सक्सेस पासवर्ड.!


डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व्याख्यानमाला : संजय आवटेंचे प्रतिपादन.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : (सहसंपादक - अमरदीप लोखंडे) दिनांक,१६/०४/२३" आज देश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे उभा आहे.' आम्ही भारताचे लोक ' ही तुमची आमची अंतीम सत्ता आहे.बाबासाहेबांनी एक राज्यघटना मनुस्मृती जाळली आणि समानतेची संविधानरुपाने दुसरी राज्यघटना दिली. गांधी,नेहरु,आंबेडकर हा आपला वारसा आहे.मतभेद होते पण मूल्यांसाठी ते एक होते,हे आपण तरुण पिढीला सांगीतले पाहिजे.आज भीमानं दिलेलं संविधान धोक्यात आहे,त्यांनी घडविले आपण वाचविले पाहिजे. प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरविले पाहिजे कारण ' जयभीम ' हाच बदलणा-या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे." असे मार्मिक विवेचन प्रसिद्ध विचारवंत,लेखक आणि पुणेच्या लोकमत आवृत्तीचे संपादक संजय आवटेंनी केले.


ते येथील पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विचारपिठावर अध्यक्षस्थानी मनोवैज्ञानिक डॉ सत्यपाल कातकर तर मार्गदर्शक म्हणून मुंबईचे डॉ बाबा पाटील उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष व नगर परिषद उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपाध्यक्ष आसाराम बोदेले,सचिव डॉ युवराज मेश्राम,सहसचिव डॉ इ.एल.रामटेके, कोषाध्यक्ष भीमराव बनकर,संघटक नेताजी मेश्राम,महिला संघटक अँड नंदा फुले आसनस्थ होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व बुध्दवंदनेने करण्यात आली.यावेळी डॉ बाबा पाटील म्हणाले की,धर्मांतरानंतर शिक्षणात सगळयात मोठी क्रांती बौध्द समाजाने केली.ज्यांनी ज्यांनी विषमतेवर प्रहार केला त्यांना त्यांना प्रस्थापित व्यवस्थेने विरोध केला.हे न जुमानता बाबासाहेबांनी आम्हाला संविधान देऊन ' शिका,संघटीत व्हा, संघर्ष करा ' हा नारा दिला, यामुळे आपली प्रगती झाली.अध्यक्षीय मनोगतात डॉ.सत्यपाल कातकरांनी, आम्ही लढवय्ये झालोत पण लोकतंत्र या देशात रुजलं नाही.मिलिंद महाविद्यालयातून निघालेली पिढी फार मोठया पदावर पोहचली ती बाबासाहेबांच्या प्रेरणेने,असे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीध्यक्ष अशोक रामटेकेंनी करुन यामागील भूमिका विशद केली.संचालन समिती सचिव डॉ युवराज मेश्रामांनी तर आभार उपाध्यक्ष आसाराम बोदेलेंनी मानले.कार्यक्रमाला कवी प्रभू राजगडकर, प्राचार्य डॉ रामटेके, प्राचार्य डॉ डी एच गहाणे,गोविंदराव भेंडारकर,अंकुश वाघमारे,डॉ धनराज खानोरकर,डॉ रवी रणदिवे,डॉ.चंद्रशेखर बांबोळे,डॉ रंगारी सह अनेक मान्यवर, बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !