चिखली येथे थोर महापुरुष यांची जयंती आणि पुरस्कार वितरण समारोह.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील चिखली येथे एकता नेहरू युवा मंडळ केसलवाडा च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त सार्वजनिक जयंती समारोह आणि पुरस्कार वितरण व समाज प्रबोधन कार्यक्रम दिनांक ११ एप्रिल २०२३ रोज मंगळवारला सायं.६ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळाजवळील पटांगणात संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी हिरालाल बारसागडे,मार्गदर्शक राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा भंडारा जिल्ह्याचे प्रचारक भोजराज गभणे, भंडाराच्या कवियत्री तथा समाजसेविका उषा घोडेस्वार, सुजाता कन्या विद्यालय अड्याळच्या शिक्षिका दिपाली दिलीप सोनुले तसेच विशेष अतिथी म्हणून अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळे, स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना चे जिल्हाध्यक्ष शेखर जीभकाटे, क्षेत्र सहाय्यक अड्याळचे विनोद पंचभाई,पंचायत समितीच्या सदस्या कल्याणी कुर्जेकर, कृषी सेविका रजनी राघोर्ते, चिखली ग्रामपंचायत च्या सरपंच महंता देशपांडे,पोलीस पाटील सुरेश काटेखाये उपस्थित राहणार आहेत.
सत्कारमूर्ती घनश्याम ठोंबरे यांना महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सेवा पुरस्कार, प्रदीप घाडगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार, शितल वैरागडे यांना धनंजयराव गाडगीळ सहकार रत्न पुरस्कार सन्मानचिन्ह व व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
यानंतर रात्री ८:३० वाजता संत गाडगेबाबा समाज प्रबोधन मंडळ नागपूरद्वारा प्रस्तुत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर व संच थोर महापुरुष विचारधारा जनजागृतीवर संगीतमय प्रबोधन कार्यक्रम सादर करणार आहे.सदर कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार,जिल्हा युवा पुरस्कार पुरस्कृत जयेंद्र चव्हाण,जयंती आयोजन समारोह समितीचे अध्यक्ष विनोद शेंडे,उपाध्यक्ष,प्रतीक रामटेके, सचिव संजय उके तसेच सदस्यगण यांनी केले आहे.