पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे समता पर्वचे उद्घाटन.
एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,०६/०४/२३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था.डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका ब्रम्हपुरी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समतापर्व चे आयोजन करण्यात आले आहे. समतापर्व चे उद्घाटन पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे करण्यात आले. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी माननीय संजय पुरी साहेब उपस्थितीत होते.
यावेळी ब्रम्हपुरी समतादूत वर्षा कारेंगुलवार यांनी 1 ते 30 एप्रिल मध्ये विविध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच तळागाळातील लोकांपर्यंत समाज कल्याण च्या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळेस पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी घुबडे साहेब ,सहायक प्रशासन अधिकारी लखदिवे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी शेळके मॅडम तसेच बाकी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ब्रह्मपुरी समतादूत रज्जूताई मेंधुळकर यांनी केले .