ग्रामसेवक,सरपंच व सरपंच पती अडकला एसीबी च्या जाळ्यात.
★ ३५ हजार रुपयाची लाच प्रकरणी.
एस.के.24 तास
गोंदिया : तक्रारदार हे बांधकाम मटेरियल सप्लायर असून त्यांनी गट ग्रामपंचायत सेजगाव खुर्द अंतर्गत प्राप्त टेंडर नुसार जण सुविधा योजने अंतर्गत सेजगाव स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा बांधकामाकरिता लागणारे 2,71,857 रुपयांचे साहित्य पुरवठा केले आहे.
या पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याची बिले मंजूर करून त्यांना 2,71,857 रुपयांचे धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी क्रमांक 1) प्रीती प्रशांत साखरे वय 36 वर्ष रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया, पद – ग्रामसेवक, यांनी 13,000 रुपये व आरोपी क्रमांक 2) अर्चना योगेश्वर कन्सरे वय 28 वर्ष पद – सरपंच, 3) योगेश्वर भैय्यालाल कन्सरे वय 36 वर्ष ( सरपंच पती ) यांनी 22,000 रुपये पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाच रकमेची मागणी करून ग्रामसेवक व सरपंच यांनी एकूण लाच रक्कम 35,000 रुपये खाजगी इसम सरपंच पती याच्याकडे देण्यास सांगून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.
आज दिनांक 20/04/2023 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्रमांक 3) सरपंच पती ( खाजगी इसम ) याने तक्रारदाराकडुन
श्री द्वारिका हॉटेल, कुडवा नाका गोंदिया येथे लाच रक्कम 35,000 रुपये पंचासमक्ष स्वीकारली तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन – रामनगर , जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. सापळा कारवाई पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, स. फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, पो हवा. संजय बोहरे, मंगेश काहलकर, नापोशी संतोष शेंडे, संतोष बोपचे ,अशोक कापसे , संगीता पटले, रोहिणी डांगे
चालक दीपक बतबर्वे सर्व ला. प्र. वि. गोंदिया. यांनी केली आहे.