ब्रम्हपुरी-आरमोरी रोड वरील उड्डाण पुलाचे बांधकाम करून रेल्वे फाटकाचे बंदोबस्त करा : ब्रह्मपुरी वासियांची मागणी.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,२२/०४/२३जगात,विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त तापमान असलेला शहर म्हणजे ब्रम्हपुरी या शहराचे एप्रिल महिन्यातील तापमान ४३.०८अंश आहे. मे जून महिन्याचे चे तापमान किती राहील याची कल्पनाच न केलेली बरी ? एवढ्या तापमानात खरेदी खाजगी कार्यालयीन काम करिता या रोडवर वाहनांची, प्रवास करणाऱ्यांची रेलचेल सारखी सुरूच असते.
अशा रखरखत्या उन्हामध्ये ब्रम्हपुरी- आरमोरी रोडवर असलेली रेल्वे फाटक पडल्यामुळे लहान -लहान मुले घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तापमानाचे चटके सोसावे लागत आहे. एकीकडे लग्नाची धामधुम आणि त्यामध्ये रेल्वे फाटक पडल्यामुळे रेल्वे फाटकाचा मोठ्या प्रमाणात होणारा त्रास या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना मानसिक , शारीरिक, आणि उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.आज रेल्वे फाटक पडल्यामुळे अंदाजे 1-2 तास चक्क भर उन्हात उभे राहावे लागेल त्यामध्ये शालेय विद्यार्थी व लग्नाला जाणारे प्रवासी सुद्धा त्यामध्ये अडकले होते.
जड वाहनाची रांग ही गंगाबाई तलमले कॉलेज पासून तर सावजी धाब्यापर्यत होती. असे परिस्थितीमध्ये सुद्धा ब्रह्मपुरी पोलीस विभागाचे ट्राफिक पोलीस राहुल लाखे व त्यांचे सहकारी यांनी रेल्वे फाटक उघडल्यानंतर जाणार- येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने मोकळे करून दिला. आणि ते नेहमी अडचणीच्या वेळेस रेल्वे फाटकावर येऊन शिस्त बद्ध पद्धतीने वाहनधारकांना मार्ग मोकळा करून देतातच त्यामुळे या रेल्वे फाटकावर अपघात होण्याचे टळते.
चिमूर -गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार व स्थानिक नेते यांनी ब्रह्मपुरी -आरमोरी रोडवर असलेल्या रेल्वे फाटकाचे उड्डाणपूलाद्वारे बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी समस्त ब्रम्हपुरीवासायांनी केली आहे.
या संदर्भामध्ये ब्रम्हपुरी येथील काही विविध पक्षाच्या नेत्यांनी व विविध संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी सुद्धा निवेदनात केली होती.परंतु निवेदनाची केराची टोपली झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रम्हपुरी आरमोरी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधकामाकरिता मंजुरी मिळाली असता , शासनाने त्या जागेवर पाणी व गिट्टी तपासणी केली होती. परंतु आता सरकार बदलल्यामुळे त्या कामावरच स्थगिती असल्यामुळे थोडा विलंब लागत असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली आहे.तरीपण लवकरात लवकर या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधून प्रवाशांची गैरसो टाळावी असे या परिसरातील जनतेची मागणी आहे.