आकाशवाणी एफ.एम.अहेरी या केंद्राच्या उद्घाटनाला खासदार,अशोक जी नेते व माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

देशाचे लाडके मान. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या शुभ हस्ते आकाशवाणी( एफ.एम.) ट्रान्समीटर केंद्राचे उदघाटन शुभारंभ पार पडला.



★ आकाशवाणी एफ.एम.अहेरी या केंद्राच्या उद्घाटनाला खासदार,अशोक जी नेते व माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


एस.के.24 तास


अहेरी : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी,बहुल, आकांक्षीत,नक्षलग्रस्त,डोंगराळ,अतीदुर्गमभाग असून सुध्दा जिल्हयामध्ये अहेरी व  सिरोंचा या ठिकाणी आकाशवाणी (एफ.एम.) दूरदर्शन,ट्रान्समीटर केंद्राचे आभासी पद्धतीनं उद्घाटन या देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडला.या आकाशवाणी (एफ.एम.) ट्रान्समीटर अहेरी या केंद्राच्या उद्घाटनाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मान.अशोकजी नेते  व माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालय येथे संपन्न झाला.



यावेळी प्रामुख्याने भाजपचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,जिल्हा महामंत्री  रविंद्र ओल्लालवार,आकाशवाणी एफ एम.ट्रांसमिटरचे एडिई निमसरकार जी, तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. 

आकाशवाणी(एफ.एम) अहेरी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना गडचिरोली जिल्हा अविकसित, आदिवासी,नक्षलग्रस्त अतिदुर्गम भाग असल्याने या जिल्ह्याचा समावेश आकांशीत जिल्हा म्हणून करण्यात आला. त्या अनुषंगाने या भागाचा विकास करण्यासाठी मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी या जिल्ह्यासाठी  भरीव निधी देत असून मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात  विशेष लक्ष देत आहे.



 आज अहेरी येथे आकाशवाणी (एफ.एम.)ट्रान्समीटर चे उद्घाटन विकासाच्या टप्प्यातील एक प्रमुख पाऊल आहे. याद्वारे देशातील  सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक घडामोडी तसेच शासकीय विविध योजनांची माहिती नागरिकांना घरबसल्या ऐकायला मिळेल.आकाशवाणी एफएम ची  कनेक्टिव्हिटी( रेंज) ३०ते ३५ किलोमीटर पर्यंत असल्याने या  क्षेत्रातील जनतेनी या सेवेचा लाभ व आनंद घ्याव.असे आव्हान याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.


या प्रसंगी पुढे बोलतांना गडचिरोली जिल्ह्यातील आकाशवाणी  (एफ.एम.) केंद्र अहेरी व सिरोंचा या अतिदुर्गम भागामध्ये दिल्याने या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांचे मी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून मनातून,हृदयातून अंतकरणातून मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार महोदयांनी दिली.


माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दोन शब्द आनंदीतपणे  व्यक्त करतांना आपल्या अहेरी  क्षेत्रामध्ये आकाशवाणी (एफएम)  केंद्र झाल्याने  निश्चितच फायदा क्षेत्रातील लोकांना होईल.याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना लोकांपर्यंत या माध्यमातून  पोहोचतील.असे हसतखुशीत व्यक्त या प्रसंगी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !