भेजगाव येथे सत्यशोधक विवाह संपन्न.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
मुल : तालुक्यातील भेजगाव येथील मनोज रत्नमाला लेनगुरे यांची मूलगी वैष्णवी हिचा सत्यशोधक विवाह सौ.लता अभिमन्यू बोरूले यांचा मुलगा किरण रा.गुंजेवाही कोठा ता.सिंदेवाही जि.चंद्रपुर यांच्या शी सत्य शोधक पद्धतीने लावण्यात आले.
समाजातील अंधश्रद्धा व पारंपारिक विचारांना नाकारून, क्रांति सुर्य महात्मा फुले व क्रांति ज्यो ती सावित्रीआई फुले यांचे विचारांना स्विकारत, वैष्णवी व किरण यांनी प्रथमच भेजगाव येथे आपला विवाह सत्य शोधक पद्धतीने लावला त्यामूळे त्यांचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे आहे, सत्यशोधक विचारवंत सुनिल कावळे यांनी विधी कर्ते म्हणून कार्य पार पाडले.
भेजगाव येथील उपसरपंच, बबन लेनगुरे, माळी समाजाचे अध्यक्ष,प्रकाश शेंडे,क्रांती ज्योत सेवा संघाचे अध्यक्ष ईश्वरभाऊ लोनबले सर, सामाजिक कार्यकर्ते नंदू बारस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा सत्यशोधक विवाह सोहळा पार पडले या प्रसंगी बराच आप्त, मित्र परीवार, गावकरी शेकडोचया संख्येने उपस्थित होते.