चुनाळा येथील महाराष्ट्र पोलीस दलात चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी आमदार,सुदर्शन निमकर यांनी केला सत्कार.
एस.के.24 तास
राजुरा : चुनाळा येथील महाराष्ट्र पोलीस दलात चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत निवड झालेल्या कु. प्राजक्ता शंकर निखाडे, कु. करिष्मा रवींद्र रागीट व अरविंद शालिकराव कुंभे यांचा सत्कार माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबा समवेत केला. उज्वल भविष्यासह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हे तीनही विद्यार्थी सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, अत्यंत परिश्रम करून यांनी यश मिळविले असून हीच चुनाळा गावासाठी अभिमानाची बाब आहे. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा याचे अनुकरण करून यश प्राप्त करावे,असा संदेश सुदर्शन निमकर यांनी दिला.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच बाळू वडस्कर सेवा सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पावडे, उपाध्यक्ष कृष्णा पोटे, मुख्याध्यापक विरुटकर सर, प्राध्यापक शंकर पेदुरवार, ग्रामपंचायत सदस्य कार्लेकर, उषा करमणकर, वारलू रागीट, लटारी मोढे, माणिक कुंभे व कुटुंबीय उपस्थित होते.