पारडगाव येथे काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी :(अमरदिप लोखंडे) १४/०४/२३ भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून पारडगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने दिनांक १३/०४/२३ ला बौद्ध विहाराच्या पटांगणात काव्य वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या काव्य वाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शैलेशजी नागदेवते प्राचार्य ,जवाहर नवोदय विद्यालय, जालना तर या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय संघरक्षक डांगे सर ब्रम्हपुरीआणि प्रमुख अतिथी म्हणून पारडगाव ग्रामपंचायतचे सरपंच पिंटू पिल्लेवान हे होते.
या काव्यवाचन कार्यक्रमात मूर्तिकार, कवी मनाचे श्री संजयजी भैसारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक , कवियत्री डॉ.सुकेशनी बोरकर, कवी श्री अमरदीप लोखंडे ब्रम्हपुरी यांनी रंगतदार ,समाज प्रबोधनात्मक जनजागृती, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित वास्तववादी काव्य वाचन करून पारडगाव वासीय उपस्थित प्रेक्षक वर्गांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री मंडपे यांनी केले.