लाखांदूर तहसीलवर विविध मागण्यासाठी महामोर्चाचे आयोजन.
★ बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचे नेतृत्वात.
★ संविधान जनजागृती रॅलीसह महामोर्चा.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : हर जोर जुल्म के टक्कर मे... संघर्ष हमारा नारा है..! हा नारा देत बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूरच्या नेतृत्वात दि 6 एप्रिल ते 9एप्रिल 2023 पर्यंत संपूर्ण लाखांदूर तालुक्यात संविधान जन जागृती रॅली व दि 10 एप्रिल रोज सोमवारला दुपारी 1 वाजता विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय लाखांदूरवर महामोर्च्याचे आयोजन केले आहे.
या संविधान रॅली व महामोर्च्याचे नेतृत्व बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूरचे मुख्य संयोजक चंद्रशेखर टेम्भूरणे, मनोज बन्सोड, बीएसएसएस तालुका अध्यक्ष मंगेश सुखदेवे,प्रा.उद्धव रंगारी,प्रा. अनिल काणेकर, विशाल लांडगे हे करणार आहेत.
तत्पूर्वी संविधान जन जागृती रॅली ही दि.6 एप्रिल रोजी दु.1 वाजता दिघोरी मोठी येथून सुरवात होईल व साय.7 वा. बारव्हा येथे मुक्काम, दि.7 रोजी मासळ येथून सुरवात व सरांडी बु येथे मुक्काम, दि 8 एप्रिल रोजी विरली बुज येथून सुरवात व मोहरणा येथे मुक्काम दि 9 रोजी भागडी येथून सुरवात होऊन मडेघाट येथे समाप्ती होऊन. दि 10 एप्रिल रोजी दु.1 वाजता विविध मागण्या घेऊन हा महामोर्चा लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
या महामोर्च्यात मुख्य मागण्या संविधानाचे उल्लघन करणे बंद करा. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न देऊन सम्मानित करा. ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करा. ई व्ही एम द्वारे निवडणूक प्रक्रिया बंद करा. शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा करा. खाजगीकरणं बंद करा. अतिक्रमण धारकांना पट्टे द्या.घरकुल निधित 3लाख पर्यंत वाढ करा.
शालेय अभ्यास क्रमातून भारतीय संविधान शिकवा. बेरोजगारांना रोजगार द्या. आदी अनेक मागण्या घेऊन हा महामोर्चा धडकणार आहे. तरी तालुक्यातील सर्व जनतेने, तसेच बोद्ध बांधव, समता सैनिक दल यांनी जास्तीत जास्त संख्येने महामोर्च्यात सहभागी व्हावे असे आव्हाहन बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती लाखांदूर तर्फ करण्यात आले आहे.