मुल तालुक्यातील विरई येथे सत्य शोधक विवाह संपन्न.


 मुल तालुक्यातील विरई येथे सत्य शोधक विवाह संपन्न.


राजेंद्र वाढई!उपसंपादक


मुल : आज दिनांक 16/04/2023 रोज रविवार ला मूल तालुक्यातील विरई येथील  प्रतिष्ठित डॉ,श्री नामदेव सोनुले यांची मूलगी समता हिचा  सत्यशोधक विवाह श्री नरेश कुमार जेंगठे यांचा मुलगा राहुल रा.गडचिरोली यांच्या शी सत्यशोधक पद्धतीने लावण्यात आले  


समाजातील अंधश्रद्धा व पारंपारिक विचारांना नाकारून, क्रांति सुर्य महात्मा फुले व क्रांति ज्योती सावित्रीआई फुले यांचे विचारांना  स्विकारत, समता व राहुल यांनी प्रथमच मुल  येथील रामलीला भवन मध्ये आपला विवाह सत्य शोधक पद्धतीने लावला त्यामूळे त्यांचे समाजात सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे आहे,सत्यशोधक विचारवंत सुनिल कावळे यांनी विधी कर्ते म्हणून कार्य पार पाडले.


आमगाव (चामोर्शी) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज सोनुले,क्रांती ज्योत सेवा संघाचे अध्यक्ष ईश्वरभाऊ लोनबले,सामाजिक कार्यकर्ते नंदू बारस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा  सत्यशोधक विवाह सोहळा  पार पडला.या प्रसंगी बराच आप्त, मित्र परीवार, गावकरी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !