रस्त्यात चोरी करणारी टोळी मूल पोलिसांच्या ताब्यात,अजयपूर मार्गांवरील घटना.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
मुल : तालुक्यांतील केळझर वरून काम आटोपुन आपल्या गावी चिचपल्ली ला जात असलेल्या एका इलेक्ट्रिशन ला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवित लुटमार करणाऱ्या टोळीला मुल पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
चिचपल्ली येथील निवासी विशाल दुधे केळझर येथे इलेक्ट्रिशन चा काम आटोपून शनिवारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या गावी जात होता. केलझर - अजयपूर मार्गावरील पुलाजवल असलेल्या तीन चोरांनी विशाल दुधे याची मोटारसायकल अडवून चाकूचा धाक दाखवित विशाल च्या खिशात असलले 640 रुपये बळजबरीने हिसकाऊन घेतले. विशाल दुधे हा कसाबसा चोरांपासून सुटका करीत आपला जीव वाचवून घरी आला. त्यानंतर लगेच मुल पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता मुल पोलिसांनी काही तासातच या प्रकरणातील केळझर येथील आरोपी 20 वर्षीय विक्की उर्फ मॅक्सवेल बळीराम मोटघरे, चिरोली येथील 23 वर्षीय शाहरुख शेख आणी चिरोली येथील एक 16 वर्षीय बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली.आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून आरोपी कडून 640 रुपये हस्तगत केले.
आरोपी विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जून इंगळे आणि पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुध्दे करीत आहे.