भाजपा कार्यालय आणि आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन, माल्यार्पण आणि अभिवादन.
★ माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र.
एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१४/०४/२३ विश्वरत्न,भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.ब्रम्हपूरी नगरीत देखील भाजपाचे वतीने भाजपा कार्यालय तसेच गुजरी वार्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी यामध्ये सर्व श्री प्रा.प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश,प्राचार्य अरुण शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा महिला ब्रह्मपुरी तालुका, इंजिनियर अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा ब्रम्हपूरी शहर,मनोज भुपाल जिल्हा महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा तथा महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी शहर,विक्रम कावळे महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी शहर, डॉ.प्रा. अशोक सालोटकर शहराध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी, भागवत सर महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा, जुमडे सर महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी शहर, वंदनाताई शेंडे उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, मंजिरीताई राजनकर सचीव भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, हेमलता ताई नंदुरकर, सुभेदार ताई, राहुल बोराडे, स्वप्निल अलगदिवे, रितेश दाशमवार.इ. मान्यवर उपस्थित होते.
भाजपा कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना प्रा. अतुलभाऊ देशकर म्हणाले की, देशाच्या, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विषमता ही खूप मोठी अडसर आहे. शालेय जीवनात बाबासाहेबांनी विषमतेविषयी खूप वाईट अनुभव सोसले.तेव्हापासून ते जीवंत असेपर्यंत देशातील, समाजातील भेदभाव,विषमता दूर करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.त्याची उपलब्धी अशी आहे की,देश आता समानतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,संचालन मनोज भुपाल यांनी केले तर आभार डॉ.प्रा.अशोक सालोटकर यांनी मानले.