बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समता,बंधुता व स्वतंत्रता समाजात रुजविण्याची गरज आहे. - डॉ. नामदेव किरसान.



बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समता,बंधुता व स्वतंत्रता समाजात रुजविण्याची गरज आहे. - डॉ. नामदेव किरसान.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी मौजा कुरुड ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथे बौद्ध महिला मंडळ कुरुड द्वारा आयोजित "सुनबाई जरा जपून" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभरी डॉ. नामदेव किरसान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात विहित केलेली समता बंधुता, स्वतंत्रता व सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे तत्व समाजात रुजविण्याची आज गरज आहे. 


जाती धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचं व द्वेष पसरविण्याचं काम काही विघटनवादी प्रवृत्तींकडून होत आहे. बोलण्याच्या व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर जर निर्बंध आणले जात असतील तर ही सपशेल संविधानात विहित लोकशाहीची पायमल्ली आहे. करिता अपप्रचाराला बळी न पडता विविध जाती धर्माच्या व पंथाच्या लोकांनी  समाजात सलोखा टिकवून ठेवून बंधूभाव वृद्धिंगत करावा असे आवाहन त्यांनी केले.


या प्रसंगी आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नानाभाऊ नाकाडे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, शंकर जी पारधी,  अविनाश भाऊ गेडाम, तलमलेजी, नंदू भाऊ नरोटे, नीलिमा ताई पठाण, युनूस भाई शेख, विजयजी कुंभलवार, विलासजी गोटेफोडे, मनोजजी निमजे, सुनीलजी पारधी, लकी भाई शेख, नामदेवजी वचाके, विलासजी पिल्लारे, यादवजी पिल्लारे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !