छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी.



छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी.


नरेंद्र मेश्राम


भंडारा : भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे मराठा साम्राज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती शहापूर तेथे सामाजिक कार्यकर्ते संजय बांगर यांच्या अध्यक्षतेखाली  व प्रमूख अतिथी मराठी साहित्य परिषद चे भंडारा जिल्हा अध्यक्ष नाशिकभाऊ  चवरे, शासकीय वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयेंद्र देशपांडे, केंद्रिय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली चे महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी, सामाजिक कार्यकर्ते अनिल घुले, अभिनय वासनिक, क्षमता वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे संपन्न करण्यात आली. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करूनअभिवादन करण्यात आले. 


या जयंती प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन कार्यावर उपस्थित अतिथिंनी प्रकाश टाकला. या महापुरुषांचे विचार आजच्या युगातही समाजाला प्रेरणादायी आहेत. महापुरुषांच्या विचारांचा राष्ट्र घडविण्याकरिता त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा व महापुरुषांना अभिप्रेत असलेला राष्ट्र घडविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनावर आप-आपले विचार व्यक्त केले.


केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली द्वारा घेण्यात आलेल्या संविधान सम्मान प्रतियोगिता परीक्षा व बुद्ध विहार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत घेण्यात आलेल्या पाली भाषा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी जानवी ढोके, रेशमा कानतोडे, दर्शना खंडाळे, संजना बुधे, गायत्री राखडे,  हिमांशु भुरे, वेदांत खांदाळे, नेहाल डोंगरे, मोनाली बारई, नुपूर कुकडे, वैष्णवी निंबार्ते, विवेक पालांदूरकर, अश्लेषा मेश्राम, सिद्देश चौधरी, सानिया बडगे, प्रितम देशमुख, सलोनी फुले, यश मेश्राम, शशिल ठाकरे, ध्रुप ठाकरे, अभिषेक हटवार, सागर बावणे, समृद्धी सुखदेवे व प्रज्ञा वहाने यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या भावी भविष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. 


डॉ.देवानंद नंदागवळी यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे आदर्श अंगिकारून, सामाजिक बांधिलकी जपून सर्वच क्षेत्रात वाटचाल करावी असे विचार व्यक्त केले. तर संजना बुधे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !